तरुणाला ठार मारण्याचा प्रयत्न करणारा गजाआड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तरुणाला ठार मारण्याचा प्रयत्न करणारा गजाआड
तरुणाला ठार मारण्याचा प्रयत्न करणारा गजाआड

तरुणाला ठार मारण्याचा प्रयत्न करणारा गजाआड

sakal_logo
By

ठाणे, ता. ५ (वार्ताहर) : काही दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाचा समझोता करण्यासाठी बोलावून आपल्या मित्रांसह जीवघेणा हल्ला करून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी श्रीनगर पोलिसांनी संगीत पाल या आरोपीला गजाआड केले आहे. फिर्यादी आदित्य प्रकाश इंदुलकर (वय २०) याच्या तक्रारीवरून श्रीनगर पोलिसांनी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. फिर्यादी आदित्य प्रकाश इंदुलकर राहणार किसननगर, वागळे इस्टेट व आरोपी संजित अशोककुमार पाल (वय २४) यांच्यामध्ये २ जून रोजी भांडण झाले होते. भांडण मिटवायचे आहे, असे सांगून इंदुलकर याला ३ जून रोजी रात्री १२.३० च्या सुमारास किसननगर येथे बोलावून आरोपी व त्याच्या दोन साथीदारांनी फिर्यादी व त्यांच्या दोन मित्रांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी श्रीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.