
निसर्ग वैभव फाऊंडेशनतर्फे पर्यावरण दिवस
निसर्ग वैभव फाऊंडेशनतर्फे पर्यावरण दिवस
घाटकोपर, ता. ५ (बातमीदार) ः वातावरणात झालेले बदल आणि पर्यावरणावर होणारा त्याचा परिणाम याचा प्रभाव मनुष्य जीवनावर पडत आहे. या पार्श्वभूमीवर काही पर्यावरणप्रेमींकडून दरवर्षी पर्यावरण दिवस साजरा केला जातो. घाटकोपर येथील वैभव ठाकरे या पर्यावरणप्रेमी युवकाने वर्षभरापूर्वी निसर्ग वैभव फाऊंडेशन ही संस्था सुरू केली आहे. या संस्थेमार्फत रविवारी खंडोबा टेकडी येथे वृक्षरोपण व त्याचे संवर्धन असा उपक्रम साजरा केला. खंडोबा टेकडीवर आतापर्यंत शंभरहून अधिक झाडे या संस्थेने लावली असून या झाडांना संस्थेचे कार्यकर्ते रोज सकाळी न विसरता मॉर्निंग वॉकदरम्यान पाणी व खत घालून त्याचे संगोपनदेखील करतात. आज अनेक झाडे मोठी झाली आहेत. लावलेल्या झाडांचा पर्यावरणप्रेमींकडून वाढदिवसदेखील साजरा केला जातो. त्यासाठी प्रत्येक झाडाची तारीखदेखील युवकांनी नमूद केल्याचे निसर्ग वैभव फाऊंडेशनचे अध्यक्ष वैभव ठाकरे यांनी सांगितले.