
आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत मुंबईतील विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी
आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत
मुंबईच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी
मुंबई, ता. ५ : नेपाळमध्ये पार पडलेल्या १४ व्या एनएसकेए आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिपमध्ये मुंबईतील स्पर्धकांनी दमदार कामगिरी बजावत एकूण ३० पदकांची कमाई केली. त्यात चार सुवर्णपदकांसह सहा रौप्य आणि वीस कांस्यपदकांचा समावेश आहे.
नेपाळमधील राष्ट्रीय क्रीडा संकुलात २५ ते २८ मेदरम्यान पार पडलेल्या स्पर्धेत पार्ले टिळक विद्यालय मराठी माध्यमातील स्वरा राऊत, ऋषभ शिंदे, सोहम खानविलकर, कनक परवे, पार्ले टिळक विद्यालय इंग्रजी माध्यमातील काव्य घोलम, श्राव्य कांबळे, शर्विल साळवी, मनस्वी कुंभार आणि हॉली फॅमिली स्कूलमधील प्रियांशू सावंत, बी. डी. भूता हायस्कूल (आयसीएसई) मधील अंगद कांदळगावकर इत्यादी विद्यार्थ्यांनी पदकांची कमाई केली. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करताना संघाने तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी जिंकली. स्पर्धेकरिता आंतरराष्ट्रीय कराटे प्रशिक्षक म्हणून अरविंद चव्हाण, विभावली चव्हाण व संघ व्यवस्थापक म्हणून सुनीता शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.