रेल्‍वेच्या माटुंगा कार्यशाळेत नवा विक्रम

रेल्‍वेच्या माटुंगा कार्यशाळेत नवा विक्रम

रेल्‍वेच्या माटुंगा कार्यशाळेत नवा विक्रम
एका मिनिटात ७५१ रोपांची लागवड
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मध्य रेल्वेच्या माटुंगा कार्यशाळेतील रेल्वे कर्मचारी व अधिकारी वर्गाने अवघ्या एका मिनिटात ७५१ रोपांची लागवड करून एक अनोखा विक्रम रचला आहे. पर्यावरणाबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.
जागतिक पर्यावरण दिन जगभरात दरवर्षी ५ जून रोजी साजरा केला जातो. पृथ्वीच्या संरक्षण, संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. अनेक ठिकाणी वृक्षारोपण, कुंपण, फळभाज्या बियाणे वाटप आदी उपक्रम राबवण्यात आले. मध्य रेल्वेतही सोमवारी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध उपक्रम राबवले आहेत. वाढत्या प्रदूषणामुळे निसर्गाचा समतोल बिघडत आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी वृक्षलागवडीची मोहीम केंद्र सरकारने हाती घेतली आहे. या मोहिमेत रेल्वेनेसुद्धा मोठे योगदान दिले आहे. पर्यावरणाला हातभार लावण्यासाठी रेल्वे स्थानकांच्या छतावर सोलर पॅनल, विद्युतीकरण, वृक्षवाटिकासारखे अनेक उपक्रम मध्य रेल्वेकडून राबवण्यात येत आहेत. नुकतेच जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अवघ्या एका मिनिटात तब्बल ७५१ रोपांची लागवड करण्यात आली आहे. माटुंगा येथील रेल्वेच्या वर्कशॉपमध्ये हा उपक्रम राबवण्यात आला. या वेळी रेल्वे अधिकारी, वर्कशॉप कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com