सेन्सेक्समध्ये २४० अंशांची वाढ

सेन्सेक्समध्ये २४० अंशांची वाढ

मुंबई, ता. ५ ः अमेरिकेतील, तसेच देशांतर्गत आर्थिक तपशील चांगला असल्याने आज भारतीय शेअरबाजारांची आठवड्याची सुरुवात चांगली झाली. सेन्सेक्स २४०.३६ अंश, तर निफ्टी ५९.७५ अंश वाढला.
अमेरिकी नोकऱ्यांचा तपशील चांगला असल्याने व्याजदरवाढीची भीती दूर झाल्याचे मानले जात आहे, तर भारताचा चांगला उत्पादन तपशील, वाहनविक्रीचा वाढता वेग आणि बँकांच्या कर्जात झालेली वाढ यामुळे आज शेअरबाजारात उत्साह होता. सकाळी सुरुवात चांगली झाल्यानंतर शेअरबाजार ठराविक टप्प्यात फिरत होते. सेन्सेक्स ६३ हजारांच्या अगदी जवळ गेला होता; मात्र शेवटच्या तासात विक्री झाल्याने नफा कमी झाला. तरीही दिवसअखेरीस सेन्सेक्स ६२,७८७.४७ अंशांवर, तर निफ्टी १८,५९३.८५ अंशांवर स्थिरावला.
आज एफएमसीजी, आयटी व सरकारी बँकांच्या शेअरचे भाव घसरले; तर वाहननिर्मिती कंपन्या व बँका-वित्त संस्थांच्या शेअरचे भाव वाढले. सेन्सेक्समध्ये महिंद्र आणि महिंद्र चार टक्के वाढला. अॅक्सिस बँक, टाटा मोटर प्रत्येकी दोन टक्के वाढले, लार्सन अँड टुब्रो, टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक, सन फार्मा, इंडसइंड बँक व मारुती या शेअरचे भाव एक टक्का वाढले. दुसरीकडे टेक महिंद्र, एशियन पेंट, नेस्ले, कोटक बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर या शेअरचे भाव एक टक्क्याच्या आसपास कोलमडले.
...
निफ्टीला १८,६५०-१८,७०० दरम्यान प्रतिरोध असून पुढील तेजी सुरू होण्यासाठी निफ्टी या पातळीच्या वर निर्णायकरीत्या बंद होणे जरूरी आहे. त्यासाठी शेअरबाजार एखाद्या चांगला संकेताच्या शोधात असून तो रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणानंतर किंवा निर्देशांकातील एखाद्या मोठ्या शेअरच्या वाढण्याने मिळेल. तोपर्यंत बाजार घसरल्यास खरेदी करावी.
- राजेश भोसले, एंजल वन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com