‘अदाणी’चा ३० हजार वृक्षरोपणाचा संकल्प | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘अदाणी’चा ३० हजार वृक्षरोपणाचा संकल्प
‘अदाणी’चा ३० हजार वृक्षरोपणाचा संकल्प

‘अदाणी’चा ३० हजार वृक्षरोपणाचा संकल्प

sakal_logo
By

मुंबई, ता. ५ ः अदाणी इलेक्ट्रिसिटीच्या डहाणू औष्णिक ऊर्जा केंद्रात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ३० हजार बांबूची झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. हा उपक्रम अदाणी समूहाच्या २०३० पर्यंत १० कोटी वृक्षारोपणाच्या प्रतिज्ञेचा एक भाग आहे.
दावोस येथील जागतिक आर्थिक मंचावरून अदाणी समूहाचे अध्यक्ष गौतम अदाणी यांनी हा संकल्प जाहीर केला होता. ‘आम्ही या वर्षी ३० हजार बांबूची झाडे लावणार आहोत. त्याखेरीज पर्यावरण जपणुकीसाठी आम्ही खाडीकिनारी दोन कोटी खारफुटीची लागवड केली आहे,’ असे अदाणी इलेक्ट्रिसिटीच्या प्रवक्त्याने सांगितले. याखेरीज अदाणी डहाणू औष्णिक ऊर्जा केंद्राने अनेक उल्लेखनीय पर्यावरणपूरक उपक्रम घेतले आहेत. त्यांनी सीआयआयद्वारे आयोजित केलेल्या जैवविविधता अभ्यासात २२५ फुलांच्या प्रजाती आणि १४४ प्राणी प्रजाती आणि फ्लेमिंगोसह २५ स्थलांतरित पक्ष्यांची नोंद झाली आहे.
ऊर्जा व्यवस्थापन प्रणालीसाठी जगातील पहिला प्रकल्प, हवेतील गुणवत्तेची देखरेख करणारे केंद्र, केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाच्या राखेबाबतच्या सूचनांचे पालन, २०१३ पासून प्रकल्पामध्ये पॉलिथिनच्या वापरावर बंदी, आयात कोळशासह देशांतर्गत कोळशाच्या कोळशाच्या मिश्रणात पुढाकार, पावसाच्या पाण्याचे संचय आणि पुनर्वापरासाठी पुढाकार, २०१४ ते २०२२ पर्यंत १०० टक्के राखेचा वापर असे अनेक पर्यावरणपूरक उपक्रम अदाणी इलेक्ट्रिसिटीने हाती घेतली आहेत.