महावितरणच्या कर्मचाऱ्यांची सुरक्षितता वाढली

महावितरणच्या कर्मचाऱ्यांची सुरक्षितता वाढली

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ५ : महावितरणमध्ये एका वर्षात जीवघेणे अपघात ४२ टक्क्यांनी कमी झाले; तर गंभीर इजा झाली असे अपघात ४३ टक्क्यांनी कमी झाले आहेत. याची नोंद घेऊन महावितरणला ‘ग्रीनटेक सुरक्षा पुरस्कार २०२३’ने गौरवण्यात आले. नवी दिल्ली येथे नुकताच आसामचे माजी राज्यपाल डॉ. जगदीश मुखी यांच्या हस्ते महावितरणचे संचालक अरविंद भादीकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

महावितरणच्या नियमित आणि बाह्यस्रोत कर्मचाऱ्यांचे अपघात कमी व्हावेत यासाठी कंपनीतर्फे सातत्याने प्रयत्न केले जातात. विजेची वायर तुटणे, उपकरणात दोष, आग लागणे, वायर्स किंवा विजेच्या खांबावर झाडे कोसळणे, विजेचे खांब मोडणे अथवा विजेचा झटका बसणे अशा कारणांनी विद्युत कर्मचाऱ्यांचे अपघात होतात. तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे अपघात होतात. हे अपघात टाळण्यासाठी कंपनीतर्फे सातत्याने कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येते, तसेच त्यांच्यामध्ये जागृती केली जाते.

विशेषतः पावसाळ्यापूर्वी मोठ्या प्रमाणात प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले जाते. याखेरीज सुरक्षितता प्रशिक्षण दिले जाते. कर्मचाऱ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी सातत्याने व्हॉटस ॲपच्या माध्यमातून संदेशही पाठवले जातात. या पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी महावितरणचे प्रशिक्षण व सुरक्षा विभागाचे मुख्य महाव्यवस्थापक देवेंद्र सायनेकर, कॅनरा बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक डॉ. दुबे आणि ग्रीनटेक फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. शरण उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com