नवी मुंबई प्रथम क्रमांकाची मानकरी

नवी मुंबई प्रथम क्रमांकाची मानकरी

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई, ता. ५ : महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेल्या ‘माझी वसुंधरा अभियान ३.० सन २०२२-२३’ यामध्ये नवी मुंबई महापालिका ‘क’ वर्ग महापालिकांमध्ये राज्यात प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली आहे. पुरस्काराची ७ कोटी रक्कम नवी मुंबई महापालिकेस प्रदान करण्यात येणार आहे. संपूर्ण राज्यातील मोठ्या शहरांच्या अ, ब, क वर्ग एकूण महानगरपालिकांमधून नवी मुंबईस द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
सोमवारी (ता. ५) जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित पारितोषिक वितरण सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते, मुंबई येथील एनसीपीएमध्ये झालेल्या विशेष समारंभात विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी हा मानाचा पुरस्कार स्वीकारला. याप्रसंगी आयुक्तांसमवेत अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, शहर अभियंता संजय देसाई, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे उपस्थित होते. राजेश नार्वेकर यांनी हा पुरस्कार पर्यावरणप्रेमी नवी मुंबईकर नागरिकांच्या सक्रिय सहभागाला समर्पित केला असून पर्यावरण विषयक विविध उपक्रमांमध्ये मनापासून सहभागी होणारे लोकप्रतिनिधी, विविध स्वयंसेवी संस्था व मंडळे यांचे सदस्य, पर्यावरणप्रेम जपणारे नागरिक तसेच अधिकारी आणि त्यातही विशेषत्वाने स्वच्छता, उद्यान व विविध विभागांतील कर्मचारी, त्याचप्रमाणे प्रसारमाध्यमे या सर्वांच्या एकत्रित कार्याचा हा सन्मान असल्याचे म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com