Wed, October 4, 2023

आयफोनची चोरी करणारा जेरबंद
आयफोनची चोरी करणारा जेरबंद
Published on : 7 June 2023, 10:01 am
नवी मुंबई (वार्ताहर) : खारघर सेक्टर-७ मधील गोब्लर्स रेस्टो कॅफेतून १ लाख १० हजारांचा आयफोन चोरणाऱ्या डिलिव्हरी बॉयला खारघर पोलिसांनी गोवंडी येथून अटक केली आहे. शरीफुल शाह (२०) असे या मुलाचे नाव आहे.
खारघर, सेक्टर- ७ मधील गोब्लर्स रेस्टो कॅफेमध्ये स्विगीमार्फत आलेली ऑर्डर घेण्यासाठी गेलेल्या शरीफुल शाह याने २१ मे रोजी पहाटे दोनच्या सुमारास कॅफेचालक प्रणव झेमसे यांचा आयफोन चोरला होता. हा सर्व प्रकार कॅफेतील सीसी टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. त्यामुळे या प्रकरणी खारघर पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी डिलिव्हरी बॉयचा शोध सुरू केला होता. यावेळी तांत्रिक तपास करताना मोबाईल लोकेशनवरून पोलिसांनी त्याचा माग काढत अटक केली आहे. सध्या त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.