सुकी मासळी खरेदीसाठी बाजारात ग्राहकांची पसंती

सुकी मासळी खरेदीसाठी बाजारात ग्राहकांची पसंती

सरळगाव, ता. ७ (बातमीदार) : मुरबाड तालुक्यातील सरळगाव, धसई, टोकावडे, म्हसा, मुरबाड या आठवडी बाजारात सध्या सुक्या मासळी मोठ्या प्रमाणात ग्राहक खरेदी करत आहेत. पावसापूर्वीच सुकी मच्छी घरी नेऊन ती पुन्हा उन्हात सुकवून डब्यांमध्ये साठवून ठेवली जाते. सध्या बाजारात बोंबील ५०० ते ६०० रुपये किलो, वाकटी ३५० ते ४०० रुपये, जवळा २०० ते २५० रुपये, सुकट ४५० ते ५०० रुपये, मांदेली २०० ते २५० रुपये, मुशी ३८० ते ४०० रुपये किलो या दराने विकली जात आहे. पावसाळ्यापूर्वीचे आठवडी बाजार आम्हाला महत्त्वाचे आहेत. एक एक गिऱ्हाईक ५ ते १० किलो सुकी मच्छी खरेदी करीत आहेत. वाकटी, ढोमेले, मांदेली, जवळा व सुकटीला सर्वात जास्त मागणी असते, असे विक्रत्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com