भिवंडी शहरात अचानक बत्तीगुल

भिवंडी शहरात अचानक बत्तीगुल

भिवंडी, ता. ७ (बातमीदार) : शहरातील काही भागात मंगळवारी दुपारपासून अचानक वीज खंडित होत आहे. यामुळे सलग सात तास वीज येणार नसल्याची माहिती कंपनीने दिल्याने नागरिक वैतागले आहेत. टॉरेन्ट पॉवरचे लोडशेडिंगचे नियोजन नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला असून याबाबत दाद मागण्यासाठी ग्राहक मंचाचे दार ठोठावणार आहेत. राज्य शासनाने शहरातील नागरिकांना वीजपुरवठा करून त्याची वसुली करण्यासाठी फ्रॅन्चायसी टोरेंट पॉवर कंपनीस दिली आहे. पूर्वी शहरात एमएसईबीमार्फत होणाऱ्या वीज ट्रान्सफार्मरवरील पुरवठा इतर ठिकाणी वळविल्याने नागरिकांना वारंवार लोडशेडिंगचा फटका बसत आहे. तसेच पावसाळ्यात पाण्याखाली जाणारे ट्रान्स्फार्मर इतर ठिकाणी न हलविल्याने ऐन पावसात वीज खंडित होण्याच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याबाबत तक्रार करूनही त्यावर करावी केली जात नाही. अशात शहरातील मध्यवर्ती भागातील नागरी वस्तीमध्ये वीज नसल्याने नागरिकांनी मनमानीपणे वागणाऱ्या टोरेंट कंपनीविरुद्ध ग्राहक मंचाकडे तक्रार करण्याची तयारी केल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून उमटली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com