महाराजांकडून संकटावर मात करत काम करण्याची प्रेरणा घ्यावी

महाराजांकडून संकटावर मात करत काम करण्याची प्रेरणा घ्यावी

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. ७ : छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेत आपण सर्वांनी जोमाने कामाला सुरुवात करू या. आपल्या प्रगतीचे हे पाऊल असेच पुढे टाकू या. प्रामाणिक, मेहनतीने, येणाऱ्या प्रत्येक अडचणी आणि संकटावर मात करत काम करण्याची प्रेरणा आपण सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांकडून सातत्याने घ्यायला हवी, असे मत ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी मंगळवारी व्यक्त केले. शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेतील आवारात कार्यक्रम सकाळी पार पडला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाची शोभा वाढविण्यासाठी गीत व पोवाडा जयवंत भंडारी यांनी सादर केले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक साडेतीनशे वर्षांपूर्वी ६ जून रोजी झाला. हा दिवस स्वराज्याची, सार्वभौमत्वाची, स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा दिवस आहे. या दिनाचे महत्त्व आणखीन दृढ करण्यासाठी ६ जून हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायती, पंचायत समिती व जिल्हा परिषद कार्यालयामध्ये ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मनुज जिंदल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी शासन निर्देशांनुसार मानाची स्वराज्यगुढी उभारून वंदन करण्यात आले. राष्ट्रगीत व राज्यगीत गात उत्साही वातावरण निर्माण झाले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य किती विशाल आहे, याबद्दल माहिती दिली. छत्रपती शिवाजी महाराज की जय, म्हणत वातावरण प्रसन्न होऊन महाराजांच्या आठवणींना व इतिहासाला उजाळा दिला गेला. आपण छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो व सर्वांना शिवराज्याभिषेक दिनाच्या सदिच्छा देतो, असे प्रतिपादनही मुख्य कार्यकारी अधिकारी जिंदल यांनी केले. अतिमुख्य कार्यकारी अधिकारी रूपाली सातपुते, प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा. प्र.) अविनाश फडतरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रमोद काळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पा.पु. व स्व) दादाभाऊ गुंजाळ, इतर सर्व विभागप्रमुख, तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com