म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचा राजावाडी रुग्णालयात ठिय्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचा राजावाडी रुग्णालयात ठिय्या
म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचा राजावाडी रुग्णालयात ठिय्या

म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचा राजावाडी रुग्णालयात ठिय्या

sakal_logo
By

कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन
घाटकोपर, ता. ७ (बातमीदार) ः उपनगरातील पालिकेच्या राजावाडी रुग्णालयात गेल्या चार ते पाच दिवसांपासून उदवाहन बंद असल्याने रुग्ण व कर्मचारी यांचे हाल होत असल्याची तक्रार, तसेच कामगारांचे विविध प्रलंबित प्रश्न व त्यांच्या मागण्यांसाठी आज राजावाडी रुग्णालयात म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले.
म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या उपाध्यक्षा रंजना नेवाळकर आणि संघटक मारुती साळवी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या वेळी स्थानिक कार्यकर्ते जय दाते, वंदना चितारे, नंदू लाळगे, गणेश गदरी आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी रुग्णालयाच्या परिसरात आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्यांसाठी आवाज उठवत विविध घोषणा दिल्या. आज सकाळी ११ च्या दरम्यान कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी व बंद असलेल्या उदवाहनसंदर्भात राजावाडी रुग्णालयाच्या प्रवेश द्वारावर हे आंदोलन घेण्यात आले.

या आहेत मागण्या
कामगांराचे थकीत निवृत्ती वेतन देण्यात यावे, रुग्णालयाचे बंद असलेले उदवाहन सुरू करण्यात यावे, तसेच अन्य विविध मागण्या घेऊन आम्ही आंदोलन केले. या वेळी रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी सचिन पायन्नवार यांनी आंदोलनकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेत सर्व मागण्या मान्य होतील, असे आश्वासन दिल्याचे म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे संघटक मारुती साळवी यांनी सांगितले.