Wed, October 4, 2023

"त्या" महिला टीसीने घडवली आजी-नातीची भेट !
"त्या" महिला टीसीने घडवली आजी-नातीची भेट !
Published on : 7 June 2023, 4:13 am
महिला टीसीने घडवली आजी-नातीची भेट
मुंबई, ता. ७ : दादर रेल्वेस्थानकातील एका महिला तिकीट तपासनिसाच्या सतर्कतेमुळे आठ वर्षांच्या नातीची तिच्या आजीसोबत भेट झाली. नातीची भेट होताच आजीने तिकीट तपासनीस मीनल गायकवाड यांचे आभार मानले.
मंगळवारी (ता. ६) गर्दीने भरलेल्या दादर स्थानकाच्या फलाट क्रमांक सहावर आठ वर्षांची लहान मुलगी रडत असल्याचे मीनल गायकवाड यांना निदर्शनास आले. त्यांनी वेळ न दवडता मुलीला घेऊन टीसी कार्यालयात नेऊन चौकशी केली. चौकशीदरम्यान ती हरवल्याचे गायकवाड यांच्या लक्षात आले. त्यांनी रेल्वेस्थानकावर त्याबाबत उद्घोषणा करताच काही वेळानंतर त्या मुलीची आजी टीसी कार्यालयात पोहचली. शहानिशा करून मुलीला तिच्या आजीकडे सुपूर्द करण्यात आले.