जव्हारमध्ये आई श्री गुरुकुल विद्यार्थी निवास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जव्हारमध्ये आई श्री गुरुकुल विद्यार्थी निवास
जव्हारमध्ये आई श्री गुरुकुल विद्यार्थी निवास

जव्हारमध्ये आई श्री गुरुकुल विद्यार्थी निवास

sakal_logo
By

जव्हार, ता. ७ (बातमीदार) : जव्हारसारख्या दुर्गम भागात ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे, त्यांना शिक्षण देण्याचा मानस घेऊन आई श्री गुरुकुल संस्थेने वाटचाल केली आहे. तालुक्यातील जामसर गावानजीक असलेल्या तेली पाडा येथे उभारण्यात आलेल्या आई श्री गुरुकुल विद्यार्थी निवासाचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले. संस्थेने आतापर्यंत जवळपास चारशेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व घेतले आहे. अतिशय बिकट परिस्थिती असणाऱ्या विद्यार्थ्यांना संस्थेच्या स्व. मालती गंद्रे गुरुकुलमध्ये निवासी प्रवेश देण्यात येतो. तेलीचा पाडा या ठिकाणी सहा विद्यार्थ्यांचे एक गुरुकुल याप्रमाणे तीन गुरुकुल बांधून पूर्ण झाले आहे. याचा उद्‍घाटन सोहळा वी क्लब ऑफ चेंबूर सदस्यांच्या उपस्थितीत पार पडला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून जव्हारमधील वैद्यकीय अधीक्षक डॉ. रामदास मऱ्हाड, मधुकर मुर्तडक, जामसर सरपंच विठ्ठल थेतले, सुरेखा थेतले उपस्थित होत्या.