छताचे प्लास्टर पडल्याने महिला जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

छताचे प्लास्टर पडल्याने महिला जखमी
छताचे प्लास्टर पडल्याने महिला जखमी

छताचे प्लास्टर पडल्याने महिला जखमी

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली, ता. ७ ः छताचे प्लास्टर कोसळल्याने एक महिला जखमी झाल्याची घटना डोंबिवलीजवळील देसलेपाडा भागात बुधवारी दुपारी घडली. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत.
देसलेपाडा भागातील लोढा हेरिटेज गृहसंकुलात चंद्रेश आशीष सोसायटी आहे. येथील तळ मजल्यावरील दुकानाच्या छताचे प्लास्टर बुधवारी दुपारी अचानक कोसळले. त्याचा काही भाग तिथे उपस्थित असलेल्या महिलेच्या अंगावर पडला. महिलेच्या अंगावर काँक्रीटचे लगदे पडल्याने ती जखमी झाली. दुकानातील सामानाची नासधूस झाली. पुढचे फर्निचर खराब झाले. प्लास्टर पडल्याचा मोठा आवाज झाल्याने सुरक्षारक्षक व रहिवासी घटनास्थळी आले. त्यांनी या जखमी महिलेला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी नेले. दुपारची वेळ असल्याने दुकानात ग्राहकांची गर्दी नव्हती, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती, असे रहिवाशांनी सांगितले. काही वर्षांपासून इमारतींची देखभाल न केल्याने हा प्रकार घडला असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.