गुणवत्तापूर्ण कामाला सर्वांनी प्राधान्य द्यावे!

गुणवत्तापूर्ण कामाला सर्वांनी प्राधान्य द्यावे!

बांधकाम विभागातील १६५
गुणवंत कर्मचाऱ्यांचा गौरव
मुंबई, ता. ८ : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून होत असलेला प्रत्येक प्रकल्प आणि काम राष्ट्राला समर्पित असते. राष्ट्रीय सेवेच्या वृत्तीने काम करण्याची भावना प्रत्येकात असेल तोपर्यंत आपल्या हातून निश्चित दर्जेदार कामगिरी होईल. कर्मचाऱ्यांनीही गुणवत्तापूर्ण काम करण्यास प्राधान्य द्यायला हवे. आपल्या कामातून प्रत्येक जण वेगळा ठसा उमटवू शकतो, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले. सार्वजनिक बांधकाम भवनात आयोजित बांधकाम विभागातील १६५ गुणवंत कर्मचाऱ्यांच्या गौरव सोहळ्यात मंत्री चव्हाण बोलत होते. व्यासपीठावर विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, सचिव (रस्ते) स. शं. साळुंखे, सचिव (बांधकाम) सं. द. दशपुते इत्यादी मान्यवर उपस्थित होते. राज्यातील सर्व पुरस्कारप्राप्त कर्मचाऱ्यांना संबंधित विभागीय स्तरावर पुरस्कार वितरण करण्याच्या सूचना मंत्री चव्हाण यांनी विभागाला दिल्या होत्या. त्यानुसार मुंबई-पुणे विभागातील पुरस्कारप्राप्त सर्व कर्मचाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com