Sat, Sept 23, 2023

मिरा रोड येथे महिलेची हत्या
मिरा रोड येथे महिलेची हत्या
Published on : 7 June 2023, 5:53 am
भाईंदर (बातमीदार) : मिरा रोडच्या नयानगर भागात ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या महिलेचे तुकडे करून तिची हत्या केल्याचा प्रकार आज उघडकीस आला. पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटक केली आहे. मनोज (५६) आणि सरस्वती (३२) हे गेल्या काही वर्षांपासून नयानगर फेज-७ येथे राहत होते. त्यांच्या खोलीतून काही दिवसांपासून दुर्गंधी येत होती. याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घराची पाहणी केली असता, सरस्वतीची हत्या झाल्याचे समोर आले. यात तिच्या मृतदेहाचे काही तुकडेही करण्यात आले होते.