मोबाईल गेमच्या बहाणे धर्मांतरण

मोबाईल गेमच्या बहाणे धर्मांतरण

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ७ ः मोबाईल गेमच्या माध्यमातून धर्मांतरण घडून आल्याचा दावा करण्यात आला आहे. याप्रकरणी उत्तरप्रदेशमध्ये गुन्हा दाखल झाला असून गेल्या दोन दिवसांपासून गाजियाबाद पोलिसांच्या पथकाने मुंब्रा येथे तळ ठोकला आहे. मात्र, आरोपीने कुटुंबीयांसोबत पळ काढल्याचे सांगितले जात आहे. धर्मांतरणाच्या या प्रक्रियेत एकच आरोपी नसून मोठी टोळी सक्रिय असल्याचे सांगितले जात आहे.

शाहनवाज मकसूद असे या आरोपीचे नाव आहे. मुंब्य्रातील देवरी पाडा येथील शाजिया बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या शाहनवाज हा शँम्पू बनवण्याचे काम करतो. तीन भाऊ आणि आई - वडील असा त्याचा परीवार आहे. शाहनवाज मोबाईल गेम खेळता खेळता समोरचा मुलगा खेळ हरला किंवा हरू लागला की तो आपला डाव साधायचा. मोबाईल गेम हरायचे नसेल तर तो आणि त्याचे साथीदार पीडित मुलांना ‘सलाम की तरबीयत’ देत होते. त्यासाठी फेक गेमिंग आयडी बनवून तो मुलांचे धर्मांतर करत होता असे तपासात समोर आले आहे. उत्तर प्रदेश पोलिस शाहनवाजवर गेली कित्येक दिवस नजर ठेवून होती. पण त्यांना चकवा देवून पळून जाण्यात तो यशस्वी ठरला आहे.
---
असा आला गुन्हा उघडकीस
मोबाईल गेमच्या बहाण्याने धर्मांतर करण्याचा हा प्रकार उत्तरप्रदेशात समोर आला आहे. याप्रकरणी गाजियाबाद पोलिसांनी एकाला अटक केल्यानंतर मुंब्रा कनेक्शन पुढे आले. मुंब्य्रातील शाहनवाज नावाचा मुलगा मोबाईल गेमच्या आडून धर्मांतरण करत असून त्याने एका तरुणाला आपल्या जाळ्यात ओढले होते. शाहनवाज मकसूद प्रमाणेच महाराष्ट्रा असे अनेक तरुण आहेत जे विविध मार्गे धर्मांतरात गुंतले आहेत. ही माहिती मिळताच गाजियाबादचे पथक गेल्या दोन दिवसांपासून मुंब्य्रात आरोपींचा शोध घेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com