गणेशपुरीत शिवराज्यभिषेक दिन साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणेशपुरीत शिवराज्यभिषेक दिन साजरा
गणेशपुरीत शिवराज्यभिषेक दिन साजरा

गणेशपुरीत शिवराज्यभिषेक दिन साजरा

sakal_logo
By

वज्रेश्वरी, ता. ८ (बातमीदार) : ग्रुप ग्रामपंचायत गणेशपुरी येथे शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सरपंच, उपसरपंच ग्रामसेवक, सदस्य तसेच संभाजी ब्रिगेडचे ठाणे-पालघर विभागीय अध्यक्ष डॉ. योगेश पाटील, संघटक नवसु पाटील, कृष्णा पाटील, अमोल पाटील, अंगणवाडी सेविका व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. दरम्यान या कार्यक्रमाअंतर्गत शिवराज्यभिषेक दिनाचे नागरिकांना महत्त्व कळावे म्हणून पुस्तक वाटून व जनजागृती करून उत्सवात साजरा करण्यात येईल, असे प्रतिपादन ग्रामसेवक प्रमोद भोईर यांनी केले. अशाप्रकारे समाजजागृती करण्यासाठी व शिवराज्याभिषेक दिनाचे महत्त्व समाजात पोहचवण्यासाठी संभाजी ब्रिगेड आपल्याला सहकार्य करत राहील, असे प्रतिपादन डॉ. योगेश पाटील यांनी केले.