Fri, Sept 22, 2023

अंबरनाथच्या किरण माळीची निवड
अंबरनाथच्या किरण माळीची निवड
Published on : 8 June 2023, 9:58 am
डोंबिवली, ता. ७ (बातमीदार) : मध्य प्रदेश येथे होणाऱ्या ऑल इंडिया रायफल शूटिंगसाठी इंडियन मॉडेल स्कूल व जुनियर कॉलेज शूटिंग रेंज व सिद्धांत रायफल क्लब रायगडचा नेमबाज कानसई, अंबरनाथ येथील किरण माळीची निवड झाली आहे. किरणसोबतच स्वप्नील केकाने (माणगाव) व आक्षत बजाज यांचीही निवड करण्यात आली आहे. १ ते ५ जून या कालावधीत मुंबईत नेमबाजी स्पर्धा झाली होती. किरण व स्वप्नील हे ५० मीटर रायफल शूटिंग स्पर्धेत सहभागी होणार असून आक्षत हा १० मीटर रायफल गटात खेळणार आहे. त्याचबरोबर आसनसोल पश्चिम बंगाल इथे होणाऱ्या १० मीटर ऑल इंडिया पिस्तूल नेमबाजी स्पर्धेत आशुतोष मोकल (न्हावाडी), गौरव ठाकूर (चिरनेर), मानस पाटील (सारडे उरण) व आराध्य खारकर (उलवे) यांचीही निवड झाली आहे.