श्रीकृष्ण नगर पुलाला लवकरच सुरुवात

श्रीकृष्ण नगर पुलाला लवकरच सुरुवात

श्रीकृष्ण नगर पुलाला लवकरच सुरुवात
पालिका आयुक्‍तांचे प्रकाश सुर्वे यांना आश्‍वासन
मुंबई, ता. ८ : मागाठाणे येथील नॅशनल पार्कजवळील श्रीकृष्ण नगर नदीवरील पुलाची दुसरी लेन सुरू होण्यासाठी वन खात्याची एनओसी मिळताच या पुलाच्या कामाला पालिका प्रशासन सुरुवात करेल, असे आश्वासन पालिका आयुक्तांनी शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांना दिले.
नुकतीच पालिका मुख्यालयात मागाठाणेच्या विविध समस्यांबाबत आमदार प्रकाश सुर्वे यांची पालिका आयुक्तांबरोबर व अधिकाऱ्यांबरोबर संयुक्त बैठक झाली. या वेळी चौगुले नगर येथील रस्तारुंदीकरणाच्या आड येणाऱ्या ११ झोपडपट्टीवासीयांचे पीएपी योजनेअंतर्गत पुनर्वसन करण्याचे आणि चौगुले नगर येथील रस्तारुंदीकरण करण्याचे पालिका आयुक्तांनी आदेश दिले. दहिसर पूर्व रावळपाडा येथील नागरिकांना १४८ चाचण्या मिळण्यासाठी पॉलिक्लिनिक सुरू करून करण्याची मागणी सुर्वे यांनी केली. त्यावर तेथे डॉक्टरांची नियुक्ती व सेवा सुविधा उपलब्ध करून पॉलिक्लिनिक सुरू करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले.
बोरिवली पूर्व येथील धीरज रिजन्सी सोसायटीला ताबा प्रमाणपत्र देण्यासाठी ॲमनेस्टी योजनेअंतर्गत लवकर पूर्तता करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. कांदिवली पूर्व ठाकूर कॉम्प्लेक्स येथील महालक्ष्मी उद्यानात सकाळी मॉर्निंग वॉकला येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी शौचालय उपलब्ध करून देण्यासही आयुक्तांनी आर दक्षिण विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com