कासा - सायवन मार्गावर अपघातात एकाचा मृत्यू

कासा - सायवन मार्गावर अपघातात एकाचा मृत्यू

कासा, ता. ८ (बातमीदार) ः आयशर टेम्पोचा अपघात होऊन यात चालकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. डहाणू तालुक्यातील कासा - सायवन राज्य मार्गावर हा अपघात झाला.

सिल्वासाहून कासामार्गे हा टेम्पो जात होता. पावनखिंड गावच्या हद्दीत रात्री साडेनऊच्या दरम्यान चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो रस्त्याच्या बाजूस उलटला. यात चालक राजबली यादव (वय ४४) याच्या डोक्याला आणि पायाला गंभीर मार लागला. यात तो जागीच मरण पाला. टेम्पो उलटल्यामुळे त्यातील सामान रस्त्यात अस्ताव्यवस्त पडले होते. या रस्त्यावर दिशादर्शक तसेच सूचनादर्शक फलक नाहीत. रिफ्लेक्टर दर्शक रेडियम पट्ट्या मारलेल्या नाहीत. अनेक भागात तीव्र वळणावर सुरक्षा गार्ड नसल्यानेदेखील अपघाताचे प्रमाण वाढत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, स्थानिक पोलिस प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिक करत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com