विठू रायाच्या वारीसाठी लालपरी सज्ज

विठू रायाच्या वारीसाठी लालपरी सज्ज

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ८ : दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीदेखील आषाढी एकादशीला विठुरायाच्या दर्शनाला वारकरी संप्रदाय आतुर झाला आहे. विठुचा गजर करत लाखो भक्तगण पायी चालत पंढरपूरला जात असतात. पण ज्या वारकऱ्यांना पायी चालत जाणे शक्य होत नाही त्यांच्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची लालपरी सज्ज झाली आहे. ठाणे जिल्ह्यातून ६० जादा बसचे नियोजन करण्यात आले आहे. या बसचे ग्रुप आरक्षण आणि तिकीट आरक्षण सुरू झाले आहे. आतापर्यंत दोन ग्रुप बुकिंग झाले आहे. या दिवसात पंढरपूरला जाण्यासाठी बसची जशी मागणी होईल, तशी व्यवस्था केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
येत्या २९ जून २०२३ रोजी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे जाणाऱ्या भाविकांकरीता राज्य परिवहन ठाणे विभागाकडून ठाणे बस स्थानक, भिवंडी, कल्याण, विठ्ठलवाडी, डोबिंवली, वाडा, शहापूर, मुरबाड, बोरीवला नॅन्सी कॉलनी येथून येत्या २५ जून २०२३ पासून जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच २९ जून ते ४ जुलै २०२३ पासबन चंद्रभागा बसस्थानक, पंढरपबर येथुन परतीची वाहतूक करण्यात येणार आहे. सोडण्यात येणाऱ्या सर्व जादा गाड्यांचे आरक्षण एक महिना अगोदर या पद्धतीने उपलब्ध करू देण्यात आले आहे. परतीचे आणि ग्रुप पद्धतीचे आरक्षण करण्याची व्यवस्था प्रत्येक बसस्थानकावर करण्यात आलेली आहे.

------------
या आगारामधून निघणार गाड्या
आगार बसची संख्या
ठाणे आगार क्र. १ - १०
ठाणे आगार क्र. २ - ०८
कल्याण - ०९
भिवंडी - ०७
विठ्ठलवाडी - ०७
मुरबाड - ०७
शहापूर - ०६
वाडा - ०६

---------------
गतवर्षी धावल्या १२० गाड्या
गतवर्षी नियोजन केलेल्या जादा गाड्यांव्यतिरिक्त मागणीनुसार गाड्यांची संख्या वाढून ती १२० झाली होती. त्या गाड्यांनी ४९८ फेऱ्या केल्या होत्या. या वर्षीही गाड्यांचे नियोजन करण्यात आले असून जशी गाड्यांची मागणी होईल, त्या पद्धतीने गाड्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यातच, या वर्षी ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी असलेल्या योजनांमुळे यंदा ही गाड्यांची संख्या निश्चितच वाढण्याची शक्यता जास्त आहे. यादृष्टीने सर्व खबरदारी घेण्यात आलेली असून मागणी नुसार गाड्या उपलब्ध करून देण्याची तयार ठाणे विभागाने केलेली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com