वाहतूक पोलीस हवालदाराला मारहाण करणार्‍या रिक्षाचालकास अटक

वाहतूक पोलीस हवालदाराला मारहाण करणार्‍या रिक्षाचालकास अटक

वाहतूक पोलिसाला मारहाण करणाऱ्या रिक्षाचालकास अटक
अंधेरी, ता. ८ (बातमीदार) ः वाहतूक पोलिस हवालदाराशी हुज्जत घालून त्याला मारहाण करणाऱ्या‍ रिक्षाचालक जमील अयुब सय्यद याला वांद्रे पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध विविध कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सुभाष गांगुर्डे पोलिस हवालदार असून ते त्यांच्या कुटुंबीयांसोबत शीव प्रतीक्षानगरात राहतात. सध्या ते वांद्रे वाहतूक पोलिस चौकीत कार्यरत आहेत. बुधवारी ते वांद्रे रेल्वेस्थानकाजवळ वाहतूक नियंत्रण करत असताना नो-पार्किंग क्षेत्रात असलेल्या तीन रिक्षांचे फोटो काढत होते. तेव्हा तिथे आलेल्या जमील सय्यदने त्यांच्याशी हुज्जत घालून त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com