शरद पवार यांना धमकीप्रकरणी गुन्हा दाखल

शरद पवार यांना धमकीप्रकरणी गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता.९ : ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार धमकी प्रकरणात मुंबईतील एल.टी मार्ग पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास आता मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा करणार आहे. समाज माध्यमावरील दोन प्रोफाइल नर्मदाबाई पटवर्धन आणि सौरभ पिंपाळकर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून या संदर्भात करण्यात आलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून एका सोशल मीडिया अकाऊटवरून शरद पवारांना ही धमकी देण्यात आली. “तुमचाही दाभोलकर होणार”, अशी पोस्ट या अकाऊटवर करण्यात आली आहे. तसेच, या धमकीबरोबरच शरद पवारांना अश्‍लिल भाषेत शिवीगाळही करण्यात आली.

दरम्यान याबाबत शरद पवार म्हणाले की, ‘मी धमकीची चिंता करत नाही, धमक्यांना घाबरत नाही. ज्यांच्याकडे जबाबदारीची ही सूत्रे आहेत, त्यांना जबाबदारी टाळता येणार नाही, कोणत्याही घटनेवर मत मांडण्याचा देशाच्या प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे. आणि धमक्या देऊन जर कोणाचा आवाज बंद करू शकेल असे कोणाला जर वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे.’ शरद पवार प्रसारमाध्यमांशी बोलताना पुढे म्हणाले की, राज्याची कायदा आणि व्यवस्थेची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे त्यांनी यासंबंधी काळजी घ्यावी. राज्याचा कायदा आणि सुव्यवस्था राखणे याची जबाबदारी सरकारवर आहे. आपल्या धमकीची चिंता नाही, आपला राज्यातील पोलिसांवर विश्वास आहे असे शरद पवार यांनी नमूद केले.

---
पोलिस आयुक्तांची भेट
शरद पवार यांना समाजमाध्यामावर दिलेल्या धमकीप्रकरणी शुक्रवारी खासदार सुप्रिया सुळेंनी मुंबई पोलिस आयुक्तांची भेट घेत याबाबत तक्रार दिली. यासंदर्भात गृहविभागाने लक्ष घालण्याची मागणी सुप्रिया सुळे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com