मतमतांतरे

मतमतांतरे

Published on

विडंबनात्मक झाडाझडती
‘सकाळ’च्या २० मे रोजीच्या ‘अवतरण’मधील ‘सेमी-प्रामाणिक मुंबई’ हा सॅबी परेरा यांचा लेख मनापासून आवडला. रीडर्स डायजेस्टच्या उपक्रमाने मुंबईकरांच्या प्रामाणिकतेला जगमान्यता मिळाली असली, तरी आपल्या आसपासच्या समाजातील प्रामाणिकपणाच्या रोगाची केलेली विडंबनात्मक झाडाझडती खुप काही सांगून जाते. प्रामाणिकपणाची साक्ष देण्यासाठी सॅबी यांनी परीक्षेची समीक्षा, मिसळ-पाणीपुरी-शेवपुरीची चव, पुणेकरांची वामकुक्षी, देवगड हापूस अशी दिलेली उदाहरणं निव्वळ भन्नाट आहेत आणि लोटपोट हसवून जातात. असाच हास्यफवारा प्रामाणिक लाकूडतोड्याच्या गोष्टीचा सकारात्मक विचार वाचताना होतो. प्रामाणिकपणाचे प्रमाण हे व्यक्तीसापेक्ष आहे जे आर्थिक कुवतीनुसार, व्यावसायिक वकुबानुसार बदलत जाते, हेही खरं. हातावर पोट असलेल्यांनी प्रामाणिकपणे आपल्या कामाचे मोल मागावे; पण अधिकारी वर्ग, डॉक्टर, वकिली, लेखापरीक्षक अशा सुस्थापितांनी त्यांच्या पदानुसार वाटेल, त्या भावाने सर्वसामान्यांकडून अपेक्षा ठेवावी हे सगळीकडे दिसून येते. लेखाच्या शेवटी सॅबी परेरांनी आपल्या खुमासदार शैलीत दादांच्या तोंडून व्यक्त केलेल्या अपेक्षा हसता हसता गांभीर्याने विचार करायला भाग पाडतात, हे या लेखाचे खरे संचित आहे. शनिवारी अशा सुंदर लेखाची मेजवानी दिल्याबद्दल ‘सकाळ’चे आभार!
नकुल चुरी, विरार (पूर्व)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com