केवळे समुद्रकिनारी वृक्ष लागवड

केवळे समुद्रकिनारी वृक्ष लागवड

पालघर, ता. ३१ (बातमीदार) : पर्यावरण संवर्धन मंडळ व लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ४५० कोनोकापर्स झाडांची लागवड केळवे सागरी पोलिस ठाणे व समुद्र किनारी करण्यात आली. तसेच केळवे सागरी पोलिस ठाणे येथे ६५ नारळ झाडे व ३५ बोगनवेल लावण्यात आली. केळवे सागरी पोलिस ठाण्याचे जयदीप सांबरे यांनी २० नारळ झाडे लागवडीसाठी दिली. यावेळी पर्यावरण संवर्धन मंडळाचे सभासद व लायन्स क्लब ऑफ केळवेचे सभासद उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी नितीन पाटील यांनी पुढाकार घेतला. तसेच केळवे सुभाष नगरमधील लहान मुलांनी व तरुणांनी उत्स्फूर्तपणे वृक्षारोपण कार्यक्रमात भाग घेतला.

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com