Sat, December 2, 2023

किशोर शिवदे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार
किशोर शिवदे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार
Published on : 27 September 2023, 12:39 pm
कासा, ता. २७ (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या धरमपूर बेलकरपाडा शाळेचे मुख्याध्यापक किशोर शिवदे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. किशोर शिवदे यांनी १३ वर्षांच्या सेवेत लोकसहभागातून शाळा विकास, राखी उपक्रम असे विविध उपक्रम राबविले. त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेत डहाणू तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, सभापती प्रवीण गवळी, जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ चौधरी, पंचायत समिती सदस्य स्नेहलता सातवी, एस राऊत, गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते, गटशिक्षणाधिकारी माधवी तांडेल, विस्तार अधिकारी गंगाराम धाडगे, बच्चू वाडू यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान केला.