शिंदे गटाच्या असहकार्यामुळेच भिवंडीत भाजपचा पराभव : नरेंद्र पवार

शिंदे गटाच्या असहकार्यामुळेच भिवंडीत भाजपचा पराभव : नरेंद्र पवार
Published on

शिंदे गटाच्या असहकार्यामुळेच भिवंडीत भाजपचा पराभव : नरेंद्र पवार
कल्याण, ता. ३० (वार्ताहर) : भारतीय जनता पक्ष कायम आपल्या सहकारी पक्षांना बरोबर घेऊन काम करत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक महत्त्वापूर्ण योजना शेवटच्या गरजू माणसापर्यंत पोहोचवण्याचे काम मागील १० वर्षांपासून करत आहे. जनतेसाठी कायम कार्यरत राहणे हे माझ्यावरील संस्कार आहे. यात बंडखोरीचा विषय आला कुठे? ज्यांनी खंजीर खुपसण्याची भाषा केली. त्यांनी भिवंडी लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी काम केले व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीत खंजीर खुपसला, असे जोरदार उत्तर माजी आमदार नरेंद्र पवार यांनी शिंदे गटाचे भिवंडी जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांना दिले. माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या सामाजिक कार्यावर बोट ठेवत मोरे यांनी टीका केली होती.

२०१४ च्या निवडणुकीत जनतेने मला कल्याण पश्चिम विधानसभेत आमदार केले. त्या पाच वर्षांच्या कालावधीत मी अनेक विकासकामे केली. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत जनता आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे अपक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे गेलो. त्या वेळी मला दुसऱ्या क्रमांकाची ४४ हजार मते मिळाली. निवडणुकीत पराभव झाला म्हणून मी काम करणे सोडले नाही. या उलट पराभव झाल्यावर लगेच तातडीने कामाला सुरुवात केली.

माझ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून महायुतीची कामे जनतेपर्यंत पोहोचवत आहे. खासदारकीच्या निवडणुकीत भिवंडी लोकसभेत या लोकांनीच महायुतीत मिठाचा खडा टाकला. त्यांच्या असहकार्यामुळेच भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांच्या तोंडी ही भाषा शोभत नाही, अशी टीका माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com