दिवाळीत मिठाईऐवजी सुक्या मेव्याला पसंती
दिवाळीत मिठाईऐवजी सुकामेव्याला पसंती
डोंबिवली, ता. ३१ (बातमीदार) : सणासुदीला नातेवाईक, तसेच आप्तेष्टांना भेटवस्तू देण्यात येतात. याबरोबरच आणखी एक वस्तू आवर्जून भेट दिली जाते, ती म्हणजे सुकामेवा होय. काजू, बदाम, अंजीर इत्यादींनी भरलेली व आकर्षक सजावट केलेल्या बॉक्समध्ये मिळालेला सुकामेवा पाहून सर्वजण आनंदी होतात. त्यामुळे दिवाळीत सुकामेव्याला मागणी वाढते. या वेळी सुकामेव्याने बाजारात चांगलाच भाव खाल्ला आहे.
दिवाळीत भेट स्वरूपात देण्यासाठीही सुकामेव्याला सर्वाधिक पसंती मिळत आहे; मात्र यंदा सुकामेव्याच्या भावात १० ते ३० टक्क्यांपर्यंतची वाढ झाली आहे. याचा सर्वसामान्यांना फटका सहन करावा लागत आहे. काजू, अंजीर आणि अक्रोडच्या भावात मागील वर्षीच्या तुलनेत मोठी वाढ झाली आहे. घरोघरी फराळाचाही सुगंध दरवळू लागला आहे. दिवाळीच्या फराळासह थंडीचीही चाहूल लागल्याने पौष्टिक लाडूंसाठी सुकामेव्याची मागणी वाढली आहे. अशातच दिवाळीत भेट स्वरूपात देण्यासाठी आकर्षक स्वरूपात पॅकिंग केलेला सुकामेवाही बाजारपेठेत दाखल झाला आहे.
नातेवाइकांसह मित्रपरिवार, तसेच कर्मचाऱ्यांना भेट देण्यासाठी कॉर्पोरेट कंपन्या आणि व्यावसायिकांकडूनही सुकामेव्याची मागणी वाढली आहे. बाजारात २५० रुपयांपासून ५००० रुपयांपर्यंतचा आकर्षक पॅकिंगमधील सुकामेवा उपलब्ध आहे.
दिवाळीनिमित्ताने सुकामेव्याला मागणी वाढली आहे. कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना सुकामेवा भेट देण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. दिवाळीपूर्वी सुकामेव्याच्या गिफ्ट पॅकेटची मागणी वाढू लागली आहे.
जयेश जैन, व्यावसायिक
प्रकार प्रतिकिलो (भाव रुपयांत)
काजू : १००० ते १६०० रु. किलो
बदाम : ७६० ते १००० रु. किलो
अंजीर : १३०० ते २००० रु. किलो
अक्रोड : १३०० रु. किलो
पिस्ता : ११०० रु. किलो
मखाण: १२०० रु. किलो
किसमिस: ३८० रु. किलो
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

