रिपब्लिकन एकता आघाडीची समन्वय समिती स्थापन

रिपब्लिकन एकता आघाडीची समन्वय समिती स्थापन

Published on

रिपब्लिकन एकता आघाडीची समन्वय समिती स्थापन
महाविकास आघाडीला पाठिंबा कायम
धारावी, ता. ३१ (बातमीदार) : विधानसभा निवडणुकीत भाजपची भिस्त मित्रपक्षांपेक्षाही मत विभागणीवरच अधिक आहे. असे नमूद करत लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला साथ दिलेल्या काही छोट्या-मोठ्या आंबेडकरवादी संघटना आणि गटांनी या वेळीही महाविकास आघाडीसोबत कायम राहण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयाचे दलित संघटनांसोबत झालेल्या एका संयुक्त बैठकीत महाविकास आघाडीतर्फे ज्येष्ठ शिवसेना नेते सुभाष देसाई, खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई यांनी एका बैठकीत स्वागत केले आहे. त्या पार्श्वभूमीवर, रिपब्लिकन एकता आघाडीच्या मुंबईत नुकत्याच झालेल्या एका बैठकीत प्रचारमध्ये मविआतील तीनही पक्षांशी संवाद, संपर्क राखण्यासाठी एक समन्वय समितीही स्थापन करण्यात आली आहे. ही बैठक आझाद मैदान येथील रिपब्लिकन पक्ष (खोरिप) कार्यालयात पार पडली.
रिपब्लिकन एकता आघाडीच्या या समन्वय समितीमध्ये सुरेश केदारे (दलित पँथर), मिलिंद सुर्वे (पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र), भाऊ निरभवणे (रिपब्लिकन पक्ष- खोब्रागडे), सागर संसारे (स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष), रवी गरुड (दलित सेना), मनोज बागुल (रिपब्लिकन जनशक्ती), प्रकाश हिवाळे (लोक मोर्चा), सतीश डोंगरे (आंबेडकरवादी भारत मिशन), बंधुराज लोणे (ज्येष्ठ पत्रकार) यांचा समावेश आहे.
समन्वय समितीमधील सदस्यांसहित या रिपब्लिकन एकता आघाडीच्या बैठकीला प्रख्यात साहित्यिक अर्जुन डांगळे, कॉ. सुबोध मोरे, मिलिंद पखाले (नागपूर), ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ, भगवान गरुड (स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष), भागवत कांबळे (रिपब्लिकन पक्ष - खोब्रागडे ), मंगेश पगारे ( पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र), शिवाजी गायकवाड, अनिल लगाडे, शशिकांत हिरे, रामानंद पाला हे घटक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजपने ही निवडणूक केवळ सत्ता टिकवण्यासाठी नव्हे, तर राज्यसभेत बहुमत प्राप्त करण्यासाठी अधिक महत्वाची मानली आहे. कारण त्या बहुमतानंतरच भाजपला जाचक वाटत असलेले धर्मनिरपेक्ष राष्ट्र आणि संविधान याबाबत निर्णायक पावले उचलणे शक्य होणार आहे. त्यामुळे बौद्ध समाजाने, आंबेडकरी चळवळीने या वेळी सत्तांतर घडवण्यास सर्वोच्च प्राधान्य देणे काळाची गरज ठरली आहे, असे रिपब्लिकन एकता आघाडीने आपल्या पत्रकात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com