खारघरमध्ये शनिवारपासून श्रीमद् भागवत कथा कार्यक्रम
खारघर, ता. ११ (बातमीदार) : राजकुमार जगदीश प्रसाद कसेरा वेलफेअर ट्रस्टच्या वतीने सेंट्रल पार्कलगत असलेल्या खारघर कॉर्पोरेट पार्कच्या भूखंडावर १४ ते २० डिसेंबरदरम्यान साध्वी ऋतुंभरा श्रीमद्भागवत कथा सादर करणार आहेत. भागवत कथेच्या पहिल्या दिवशी शनिवार (ता. १४) दुपारी १२ वाजता शिल्प चौक ते कॉर्पोरट पार्कदरम्यान कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी तीन वाजता श्रीमद्भागवत कथा विवरण होणार असून. या वेळी श्रीमद्भागवत कथा माहात्म्य, रविवारी (ता. १५) श्री शुकदेव प्रसंग, श्री नारद चरित्र आणि भीष्म कुंती स्तुती; तर सोमवारी (ता. १६) सती प्रसंग, ध्रुव प्रसंग, श्री प्रल्हाद कथा, मंगळवारी (ता. १७) श्री कृष्ण जन्म महोत्सव, श्री कृष्ण बाललीला, बुधवारी (ता. १८) गोवर्धन पूजा, गुरुवारी (ता. १९) कृष्ण रुक्मिणी विवाह; तर रविवारी (ता. २२) सुदाम चरित्र आणि व्यासपूजा झाल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

