रिजवी मेमोरियलतर्फे कॅन्सर जागरूकता मॅरेथॉन

रिजवी मेमोरियलतर्फे कॅन्सर जागरूकता मॅरेथॉन
Published on

रिजवी मेमोरियलतर्फे कॅन्सर जागरूकता मॅरेथॉन

मुंबादेवी, ता. ७ (बातमीदार) ः रिजवी ग्रुपच्या हेल्प युवरसेल्फ फाउंडेशनतर्फे आयोजित ॲड. रुबिना अख्तर हसन रिजवी आणि डॉ. अख्तर हसन रिजवी यांच्या नेतृत्वाखाली सहावी साकीब रिजवी मेमोरियल कॅन्सर जनजागृती मॅरेथॉन रविवारी (ता. ५) उत्साहात पार पडली. बीकेसी जी ८ ग्राउंड एमएमआरडीए येथे १० हजार अधिक धावपटूंनी या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला होता. यामध्ये कॅन्सर, दिव्यांग तरुण, तरुणी, हिजाब परिधान केलेल्या महिलांनीही मोठ्या उत्साहात सहभाग दर्शवल्याचे प्राचार्या वर्षा शाह आणि आयशा शेख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
यावर्षीच्या मॅरेथॉनचा प्रमुख उद्देश कॅन्सर जनजागृती, पर्यावरणीय शाश्वतता, महिला सुरक्षा आणि सशक्तीकरण असल्याचे प्राचार्य आयशा शेख यांनी सांगितले. या मॅरेथॉनमध्ये अख्तर हसन रिजवी आणि रुबीना अख्तर हसन रिजवी यांच्या हस्ते स्पर्धकांचे स्वागत करण्यात आले. यावेळी अभिनेते अरबाज खान, अभिनेत्री स्वरा भास्कर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर ऑलिंपिकपटू राहुल कदम या कार्यक्रमाचे ॲम्बेसेडर होते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, मुंबई काँग्रेस अध्यक्ष व खासदार वर्षा गायकवाड आदी या मॅरेथॉन मोहिमेला उपस्थित होते. यानिमित्ताने महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष मोबाईल ॲपचे अनावरण करण्यात आले.
MUM25E74777

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com