महाशिवरात्रीनिमित्त दापचरी कपिलेश्वर मंदिरात विविध कार्यक्रम

महाशिवरात्रीनिमित्त दापचरी कपिलेश्वर मंदिरात विविध कार्यक्रम

Published on

महाशिवरात्रीनिमित्त दापचरी कपिलेश्वर मंदिरात विविध कार्यक्रम
कबड्डी, व्हॉलिबॉल स्पर्धेचे आयोजन
कासा, ता. २५ (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील दापचरी येथील कपिलेश्वर शिवमंदिरात महाशिवरात्रीनिमित्त जय्यत तयारी सुरू आहे. विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाही भजन, कीर्तन, प्रवचन आणि क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेनिमित्त ग्रामीण भागातील बाजारही भरत आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत असलेल्या या मंदिराबद्दल छत्रपती शिवाजी महाराज सुरतेच्या मोहिमेवरून परत येताना येथे थांबल्याची आख्यायिका प्रसिद्ध आहे. त्यामुळेही येथे प्रचंड गर्दी होत असते. १९७४ मध्ये दापचरी येथे दुग्ध प्रकल्प सुरू झाल्यानंतर स्वयंभू शिवलिंगाच्या मंदिराची पुनर्स्थापना करून नवे मंदिर उभारण्यात आले होते.
महाशिवरात्रीनिमित्त कबड्डी, व्हॉलिबॉलच्या स्पर्धाही आयोजित केल्या आहेत तसेच सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहेत.
महाशिवरात्रीनिमित्त या परिसरात भरणारी ही मोठी यात्रा असून, पंचक्रोशीतील आदिवासी बांधव तसेच चारोटी, तलासरी, कासा परिसरातील शिवभक्त मोठ्या संख्येने येथे येतात. ही यात्रा बुधवार (ता. २६) पासून सुरू होणार आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्याचे श्रीकांत कुलकर्णी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com