

खालापूर, ता. १८ (बातमीदार) ः तालुक्यातील हाळ खुर्द येथे घडलेल्या गोवंश हत्या प्रकरणानंतर समाजातील एकोपा टिकून राहावा, यासाठी तालुक्यातील मुस्लिम समाजाने गोवंश हत्यामुक्त गाव आणि गोरक्षणाचा विडा उचलला आहे. याबाबत रायगड पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना सोमवारी (ता. १७) निवेदन देण्यात आले. १२ मार्चला रात्री मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गालगत हाळ खुर्द ते हाळ बुद्रुकदरम्यान सागर कॅफे हॉटेलजवळ गोवंशीय जनावरांच्या कत्तलीचा प्रकार घडला होता. खालापूरचे पोलिस निरीक्षक सचिन पवार यांनी तातडीने पथकासह घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर दोन्ही समाजात पूर्वीप्रमाणे एकोपा राहावा, यासाठी खालापूर तालुक्यातील मुस्लिम समाज लोकवस्ती असलेली गावे खोपोली शिळफाटा, चौक-तुपगाव, हाळ खुर्द, हाळ बु. आजिवली, ठाणेन्हावे तर्फे सरकार तसेच कायद्याचा सन्मान राखून यापुढे गोरक्षा करण्याचा निर्णय घेतला असल्याचे पत्र खालापूर पोलिस ठाण्यात उपस्थित अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना देण्यात आले. या वेळी उपविभागीय अधिकारी विक्रम कदम, निरीक्षक सचिन पवार, शीतल राऊत, संजय बांगर यांचे वेळोवेळी सहकार्य मिळत असल्याची भावना मुस्लिमबांधवांनी बोलून दाखवली.
गोवंश प्रजातीच्या प्रत्येक जनावरांची काळजी घेऊ तसेच तालुक्यातील प्रत्येक गोधनाची पशुसंवर्धन विभागामार्फत संबंधित शेतकरी व त्याचे गोधनाची नोंद व्हावी, जेणेकरून पाळीव व मोकाट जनावरांची ओळख होईल. गोरक्षणासाठी आमची समिती नेहमीच सहकार्य करेल, असे निवेदन खालापूर तालुक्यातील मुस्लिम समाजाने दिले आहे.
- अजीम मांडलेकर, उपसरपंच, हाळ खुर्द
समाजातील एकोपा टिकून राहावा यासाठी खालापूर तालुक्यातील मुस्लिम समाजाने घेतलेला निर्णय प्रशंसनीय आहे. असा भाईचारा सर्वत्र राहिल्यास कुठेही अनुचित प्रकार घडणार नाहीत. या निर्णयाचे अनुकरण सर्वत्र व्हायला पाहिजे.
- सोमनाथ घार्गे, अधीक्षक, रायगड पोलिस
खालापूर ः तालुक्यातील मुस्लिम समाजाने पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना गोरक्षण करण्याचे निवेदन दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.