महाबोधी महाविहारासाठी शांतता रॅली

महाबोधी महाविहारासाठी शांतता रॅली

Published on

शहापूर (वार्ताहर) : बिहार राज्यातील बोधगया महाबोधी महाविहार मुक्त करावे, महाबोधी महाविहार कायदा बीटी ॲक्ट १९४९ रद्द करावा, बोधगया येथील महाबोधी महाविहार बौद्धेत्तरांच्या ताब्यातून मुक्त करून बौद्धांच्या ताब्यात द्यावे आणि महाविहार परिसरात होणाऱ्या कर्मकांडांवर प्रतिबंध घालावेत, या मागणीकरिता मंगळवारी शहापूर शहरातून शांतता महारॅली काढण्यात आली. संत तुकाराम चौकातून पायी चालत निघालेल्या रॅलीची तहसीलदारांना निवेदन देऊन सांगता झाली. भिक्खू संघाने आंदोलन सुरू केले आहे; परंतु अद्यापपर्यंत बिहार सरकार किंवा केंद्र सरकार कुठलाही निर्णय घेण्यास अथवा हस्तक्षेप करण्यास तयार नाहीत. पोलिस बळाचा वापर करून नाहक त्रास देत आहे. त्यामुळे संविधानाच्या माध्यमातून सर्व धर्मांना धर्मस्वातंत्र्य असताना बौद्धांच्या बाबतीत वेगळा न्याय का, असा सवाल रॅलीतून उपस्थित करण्यात आला. या महारॅलीत शहापूर तालुक्यातील सर्व आंबेडकरी विचारधारेचे राजकीय पक्ष तसेच सर्व सामाजिक, धार्मिक, संस्था आणि संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com