जोगेश्वरीत मध्यरात्री रंगतो बाईक रेसचा थरार

जोगेश्वरीत मध्यरात्री रंगतो बाईक रेसचा थरार
Published on

जोगेश्वरीत मध्यरात्री रंगतो बाईक रेसचा थरार
त्रासलेल्‍या रहिवाशांचे मुख्यमंत्र्यांकडे कारवाईसाठी साकडे
निसार अली ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ ः जोगेश्वरी भागात मध्यरात्री दोन ते तीनच्या दरम्यान दुचाकीची रेस लावून दिवसभर काम करून थकूनभागून आलेल्या मुंबईकरांच्या झोपेचा खोळंबा करण्याचे काम सुरू आहे. अशा बेशिस्‍त दुचाकीस्‍वारांवर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
१०० पेक्षा जास्त दुचाकीस्‍वार मुंबईतील विविध भागांतून येऊन दर गुरुवारी दुचाकीची रेस लावतात. संतप्त रहिवाशांनी या दुचाकीस्वारांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून साकडे घातले आहे.
मृणालताई गोरे उड्डाणपुलावरून ते जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड व गोरेगाव पूर्वेतील पश्चिम दुतगती मार्गावरील हब मॉलपर्यंत तसेच वांद्रे पश्चिमेतील रिक्लेमेशन, विक्रोळी-मुलुंडपर्यंत प्रत्येक गुरुवारी दुचाकींची रेस लावली जाते. विविध प्रकारच्या दुचाकी यामध्ये सहभागी होतात. १०० किमी प्रतितास या वेगाने वेगाने या दुचाकी धावतात. दुचाकींच्या कर्णकर्कश आवाजाने पश्चिम द्रुतगती मार्गावरील गोरेगाव, बिंबिसारनगर तसेच वांद्रे रिक्लेमेशन ते मुलुंडदरम्यानच्या वस्तींतील नागरिकांची झोपमोड होत आहे. रेस संपल्यानंतर हे अज्ञात दुचाकीस्वार बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा सेंटरच्या बाजूच्या उड्डाणपुलांवरून जोगेश्वरी पश्चिमेला तसेच आपापल्या ठिकाणी परत निघून जातात.
वनराई पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विकास जाधव यांनी सांगितले की, अनेकदा हे तरुण वेगळ्या मार्गाने पळून जातात, तर काही सापडतात. सापडलेल्या तरुणांवर गुन्हे दाखल केले आहेत. तसेच वेळोवेळी नाकाबंदी व इतर कायदेशीर उपाययोजना केल्या जात आहेत.

जोगेश्वरी हा अत्यंत संवदेनशील भाग आहे. यापूर्वी बॉम्बस्फोट आणि दंगलीची झळ या भागाला पोहोचली आहे. त्यामुळे हे दुचाकीस्वार नेमके कुठले आहेत, त्यांचा काय हेतू आहे याची पोलिसांनी चौकशी करावी.
- राघवेंद्र व्यंकटेश कौलगी, समाजसेवक.

गुरुवारी मध्यरात्री काही अत्यावश्यक कामानिमित्ताने पश्चिम दुतगती मार्गाने प्रवास करायचा असेल तर जीव मुठीत घेऊन जावे लागते. कारण हे दुचाकीस्वार रस्त्यावरून भरधाव गाडी चालवतात. त्यामुळे त्यांच्यासह इतरांचेही जीव धोक्यात येतात.
- उत्कर्ष बोर्ले, रहिवासी, गोरेगाव पूर्व

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com