शिक्षणाच्या निमित्ताने लोटले वेश्याव्यवसायात

शिक्षणाच्या निमित्ताने लोटले वेश्याव्यवसायात

Published on

नवी मुंबई, ता. २७ (वार्ताहर) : कोपरखैरणेत राहणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणाने आणि त्याच्या बहिणीने शिक्षणानिमित्त राजस्थान येथून आणलेल्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला वेश्याव्यसायात ढकलल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेतील पीडित मुलीने स्वत:ची सुटका करून घेत वांद्रे रेल्वे स्थानक गाठल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
कोपरखैरणे पोलिसांनी या घटनेतील आरोपी भाऊ, बहीण आणि पीडित मुलीसोबत शरीरसंबंध ठेवणाऱ्या दोन व्यक्ती या चौघांविरोधात पिटा कायद्यासह बलात्कार तसेच पोक्सो कलमानुसार गुन्हा दाखल करून भाऊ आणि बहिणीला अटक केली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांमध्ये माँटी सिंग (२२) आणि निधी सिंग (३५) या भाऊ आणि बहिणीचा समावेश आहे. हे दोघेही मूळचे राजस्थानमधील असून, सध्या ते कोपरखैरणे सेक्टर १९ मध्ये राहण्यास आहेत. या घटनेतील १५ वर्षीय पीडित मुलगीदेखील राजस्थानमधीलच आहे. दरम्यान, मार्चमध्ये आरोपी माँटी सिंग हा राजस्थान येथे गेला असताना, पीडित मुलीच्या आईने पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी पीडित मुलीला आरोपी माँटी सिंग याच्याकडे सोपवले होते. दरम्यान, माँटी सिंग याने अल्पवयीन मुलीला कोपरखैरणेत आणल्यानंतर आपल्या बहिणीच्या मदतीने तिला वेश्याव्यवसायास जुंपले. तसेच तिला दोन व्यक्तींसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास प्रवृत्त केले.

सुटका करून घेत गाठले वांद्रे रेल्वेस्थानक
पीडित मुलीने गत शनिवारी (ता. २४) आरोपींच्या तावडीतून सुटका करून घेत आपल्या मूळ गावी जाण्यासाठी वांद्रे रेल्वेस्थानक गाठले. त्या ठिकाणी पीडित मुलगी घाबरलेल्या अवस्थेत सापडल्यानंतर रेल्वे पोलिसांनी तिची विचारपूस केल्यावर हा प्रकार उघडकीस आला. त्यानुसार बांद्रा रेल्वे पोलिसांनी पीडित मुलीला वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या माँटी सिंग आणि त्याची बहीण निधी सिंग तसेच पीडित मुलीसोबत जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवणारे दोन व्यक्ती अशा चौघांविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर हा गुन्हा कोपरखैरणे पोलिसांकडे पुढील तपासासाठी वर्ग केला. त्यानुसार कोपरखैरणे पोलिसांनी माँटी सिंग आणि निधी सिंग या दोघांना अटक केली. इतर दोघांचा शोध सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com