दिड महिन्यात जिल्हयात ३२ टक्के पावसाची नोंद

दिड महिन्यात जिल्हयात ३२ टक्के पावसाची नोंद

Published on

दीड महिन्यात रायगड जिल्ह्यात ३२ टक्के पावसाची नोंद
नुकसानीचे पंचनामे सुरू
अलिबाग, ता. २० (वार्ताहर) ः रायगड जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यात एकूण सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत ३२ टक्के पावसाची नोंद झाली आहे. मे आणि जून महिन्यात चांगला पाऊस झाला. सध्या जिल्ह्यात लावणीची कामे अंतिम टप्प्यात आली असून, धरणे, नद्याही दुथडी भरून वाहत आहेत. या पावसामध्ये जिल्ह्यातील काही ठिकाणी जीवित व वित्तहानीही झाली आहे.
नुकसान झालेल्या सर्व मालमत्तेचे व जीवितहानीचे पंचनामे सुरू असून, लवकरच नुकसानभरपाई मिळणार असल्याचे आपत्ती विभागाचे प्रमुख सागर पाठक यांनी सांगितले. आपत्ती निवारण विभागासाठी ७० लाखांचा निधी आला असून, तो तालुक्याला वाटप केला आहे.

रविवारी तालुकानिाय पावसाची नोंद
अलिबाग सहा मिमी, मुरूड १८ मिमी, पेण एक मिमी, पनवेल ६.४ मिमी, उरण पाच मिमी, कर्जत ३.२ मिमी, खालापूर तीन मिमी, माथेरान १६.४ मिमी, सुधागड १७ मिमी, माणगाव १८ मिमी, तळा १७ मिमी, महाड ४४ मिमी, पोलादपूर ७१ मिमी, श्रीवर्धन २० मिमी, म्हसळा ६५ मिमी, तवीं १० मिमी एकूण ३२१ मिमी.

Marathi News Esakal
www.esakal.com