महाराष्ट्राची द्रौपदी करून जुगारावर लावलेय

महाराष्ट्राची द्रौपदी करून जुगारावर लावलेय

Published on

महाराष्ट्राची द्रौपदी करून जुगारावर लावलेय
जितेंद्र आव्हाड यांचे टीकास्त्र

ठाणे शहर, ता. २० (बातमीदार) ः ज्या ऑनलाइन जुगाराने तरुणांनी आत्महत्या केल्या, तोच जुगार सभागृहात खेळला जात आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी ज्या सभागृहात उपाय शोधण्यासाठी सरकारला भाग पाडणे आवश्यक असताना त्या लोकशाहीच्या मंदिरात कृषिमंत्री ऑनलाइन जुगार खेळत असतील तर ही लांच्छनास्पद बाब असून सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्राची द्रौपदी करून राज्याला जुगाराच्या डावावर लावले आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा विधिमंडळ गटनेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केली.
माणिकराव कोकाटे यांच्या जुगाराच्या प्रकरणावर राजीनामा घ्यायला हवा होता; पण तो घेतला जात नाही, असेही डॉ. आव्हाड म्हणाले. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहात जुगार खेळतानाचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे. या प्रकरणावर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार हल्लाबोल चढवला. त्यांनी एक्स हँडलवरून कोकाटे यांना चांगलाच चिमटा काढत ‘शेतकऱ्यांनो विसरा हमी, खेळा रम्मी’ असा टोला लगावला आहे. ‘विधिमंडळाचे पावित्र्य न राखण्याचा विडाच सत्ताधाऱ्यांनी आखला आहे. सत्ताधारी पक्षातील एक आमदार शरद पवार, उद्धव ठाकरे, जयंत पाटील यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका करतो. बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी नको ती भाषा वापरतो, तरीही त्याला रोखत नाहीत. त्यामुळेच हा आमदार गुंड घेऊन विधिमंडळात मारामारी करायला येऊ शकतो. त्या वेळी जर मी तिथे असतो तर माझ्यावरच बिल फाडले असते, असे सांगतानाच त्या वेळी मकोका, दरोड्यातील पाच गुंड होते, त्यांची नावेही दिली आहेत; मात्र गुन्हा फक्त एकावरच दाखल करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.
...
त्यांच्यावर कारवाई का नाही?
मार खाणाऱ्याला अटक केली तशीच कारवाई इतर चार गुंड आणि त्यांना इशारा करणाऱ्यावर का नाही करत, असा सवाल उपस्थित करत, म्हणूनच मी सभागृहात खेद व्यक्त केला नाही; माझी चूक असेल तर मी गेट वे ऑफ इंडियासमोर राज्याची माफी मागायला तयार आहे; पण न केलेल्या चुकीची माफी मागणार नाही. नितीन देशमुख हा माझा कार्यकर्ता आहे. त्यासाठी मी आणि रोहित पवार रस्त्यावर भूमिका घेऊन उतरलो. त्या वेळी पोलिसांनी आम्हाला तीन तास इथून तिथे नाचवले, असेही डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com