कल्याण अवती -भवती

कल्याण अवती -भवती

Published on

रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याणच्या अध्यक्षपदी धीरेंद्र सिंह
कल्याण (वार्ताहर) : रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याणच्या अध्यक्षपदाचा पदग्रहण सोहळा नुकताच पार पडला. या कार्यक्रमात धीरेंद्र सिंह यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली, तर नामदेव चौधरी यांची सचिवपदी नियुक्ती झाली. हा कार्यक्रम रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३१४२चे प्रांतपाल हर्ष मकोल यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. धीरेंद्र सिंह यांनी रोटरी क्लबच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रमांवर भर देणार असल्याचे म्हटले. याअंतर्गत थॅलेसेमिया उच्चाटन मोहिमेसाठी १५ दिवसांत दोन रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली असून, ज्यातून १२५ युनिट रक्त संकलित झाले. तसेच उल्हासनगरमधील शासकीय थॅलेसेमिया केअर सेंटर दत्तक घेण्यात आले. रोटरी क्लबचे दिव्यांग सेंटर सहा वर्षांपासून सुरू असून, येथे मोफत कृत्रिम अवयव बसविण्यात येतात. तसेच ग्रामीण भागातील शाळांची डागडुजी व सुविधा देण्यात येतात. तसेच यंदा निधी संकलनासाठी २३ नोव्हेंबर २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय दर्जाची मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केल्याचे धीरेंद्र सिंग यांनी सांगितले.
.....................
एमसीए क्रिकेट स्पर्धांसाठी कल्याणमध्ये निवड शिबिर
कल्याण (वार्ताहर) : कांगा लीगसह विविध एमसीए क्रिकेट स्पर्धांसाठी १७ ते २३ वयोगटातील क्रिकेटपटूंसाठी कल्याणमध्ये निवड शिबीर आयोजित केले आहे. हे शिबीर २४ व २५ जुलै रोजी सकाळी नऊ ते १२ या वेळेत कल्याण स्पोर्टस फाउंडेशन, चक्की नाका, कल्याण पूर्व येथे पार पडणार आहे. या शिबिरातून निवड झालेल्या खेळाडूंना जे. भाटीया स्पोर्टस क्लब व युनियन क्रिकेट अकॅडमीमार्फत पुढील हंगामात खेळण्याची संधी मिळणार आहे. या खेळाडूंना कांगा लीग, टी-२० प्रेसिडेंट क्लब, कास्मो शिल्ड, ठोसर शिल्ड, टाइम्स शिल्ड तसेच एमसीए कॉर्पोरेट ट्रॉफी आणि अंडर-१९ अण्णा फणसे व भामा कप अशा विविध नामवंत स्पर्धांमध्ये खेळता येईल. इच्छुकांनी विलास पालुते यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
........................
रायन इंटरनॅशनल स्कूल डोंबिवलीत साहित्य महोत्सव
डोंबिवली (वार्ताहर) : रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये पहिल्या इंग्रजी साहित्य महोत्सव नुकताच पार पडला. विद्यार्थ्यांना भाषा, साहित्य व सर्जनशीलतेसाठी व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या श्वेता अय्यर यांनी वाचन, लेखन व सर्जनशीलतेच्या महत्त्वावर मार्गदर्शन केले. या वेळी वादविवाद, कथाकथन, कविता वाचन, वक्तृत्व आणि सर्जनशील लेखन स्पर्धा घेण्यात आल्या. मुख्याध्यापिका संदीपा कुमार यांनी सांगितले, की विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात आणि अभिव्यक्तीत या उपक्रमामुळे लक्षणीय वाढ झाली आहे. पालक आणि शिक्षकांचा सहभागही उल्लेखनीय होता. हा उपक्रम डॉ. ए. एफ. पिंटो, ग्रेस पिंटो आणि रायन पिंटो यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
...........................................
इंदिरानगरमध्ये स्वच्छता, वृक्षारोपण मोहीम
कल्याण (वार्ताहर) : कल्याण पूर्वेतील टिटवाळा-इंदिरानगर परिसरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने स्वच्छता व वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली. या उपक्रमाचे नेतृत्व कल्याण विधानसभा संघटक किशोरभाई शुक्ला यांनी केले. त्यांनी स्वखर्चाने नांदप रोडच्या दुतर्फा झाडे लावून परिसर स्वच्छ ठेवण्याचा आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. या मोहिमेमुळे परिसरात हरित वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जागृती वाढताना दिसत आहे. या उपक्रमात कल्याण डोंबिवली महापालिकेचे अधिकारी प्रमोद पाटील, आरोग्य निरीक्षक मोहनीश गडे, अक्षय कराळे तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व स्थानिक नागरिकांनी सहभाग घेतला.
............................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com