इमारत बांधकाम कामगारांसाठी आरोग्य कॅम्प
इमारत बांधकाम कामगारांसाठी आरोग्य कॅम्प
पोलादपूर, ता. १८ (प्रतिनिधी) : इमारत बांधकाम कामगारांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि त्यांना शासनाच्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी महाड विधानसभा मतदारसंघात आरोग्य कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. मोरगिरी, सडवली आणि चोळाई ग्रामपंचायतीतील असंघटित बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी आयोजित हा उपक्रम कामगारांच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरला.
हा कॅम्प शिवसेना पक्षाच्या पुढाकाराने, मंत्री नामदार भरत गोगावले आणि युवासेना कोअर कमिटी सदस्य विकासशेठ गोगावले यांच्या विशेष सहकार्याने आयोजित करण्यात आला. यासाठी सहसंपर्क प्रमुख चंद्रकांत कळंबे यांनी मार्गदर्शन केले. या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे मजुरांची मोफत आरोग्य तपासणी करणे, त्यांना विविध योजनांची माहिती देणे आणि शासनाच्या नोंदणीत समाविष्ट करून घेणे हा होता. या आरोग्य कॅम्पमध्ये १०० ते २०० बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबीयांनी सहभाग घेतला. रक्तदाब, रक्त तपासणी, मधुमेह, श्वसनविकार, शरीर मास निर्देशांक यांसारख्या तपासण्या करण्यात आल्या. तसेच काही कामगारांना पुढील उपचारासाठी योग्य सल्लाही देण्यात आला. या वेळी कामगारांना शासनाच्या विविध आरोग्य व सामाजिक सुरक्षा योजनांविषयी माहिती देत प्रत्यक्ष नोंदणीसाठी मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमाला तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तालुकाप्रमुख नीलेश अहिरे, उप तालुकाप्रमुख सतीश शिंदे, विभागप्रमुख लक्ष्मण मोरे, महिला आघाडी विभाग संघटिका गीता दळवी, महाळुंगे सरपंच विकास नलावडे, युवासेना समन्वयक विक्रम भिलारे, कार्यालय प्रमुख सुनील तळेकर, प्रसाद पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.