भारतीय जाहिरात विश्वाचे दिग्गज पियुष पांडे यांचे निधन
पीयूष पांडे यांचे निधन
भारतीय जाहिरात विश्वातील दिग्गज हरपला
मुंबई, ता. २४ : भारतीय जाहिरात विश्वातील दिग्गज पीयूष पांडे (वय ७०) यांचे शुक्रवारी (ता. २४) पहाटे मुंबईत निधन झाले. ते सुप्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री इला अरुण तसेच दिग्दर्शक प्रसून पांडे यांचे भाऊ होते. चार दशकांहून अधिक काळ ते कार्यरत होते. त्यांनी भारतीय जाहिरात क्षेत्राला नवीन दिशा दिली. भारतीय संस्कृतीशी जोडलेल्या त्यांच्या जाहिरातींनी देशातील कोट्यवधी लोकांची मने जिंकली. त्यांच्या पश्चात पत्नी नीता पांडे आहेत.
पांडे राजस्थानातील जयपूर येथे १९५५मध्ये जन्मले. त्यांनी सेंट झेव्हियर्स शाळा (जयपूर) आणि सेंट स्टीफन्स कॉलेज (दिल्ली) येथे शिक्षण घेतले. जाहिरात क्षेत्रात येण्यापूर्वी ते राजस्थान संघासाठी रणजी क्रिकेट खेळले होते. तसेच चहा टेस्टिंग आणि बांधकाम क्षेत्रातही काम केले. १९८२मध्ये त्यांनी ‘ओगिल्वी अँड मेथर’मध्ये प्रवेश केला आणि पुढील चार दशकांमध्ये ‘फेविकॉल’, ‘एशियन पेंट्स-हर खुशी में रंग लाए’, ‘कॅडबरी-कुछ खास हैं’ आणि ‘हच-व्हेअरव्हर यू गो, अवर नेटवर्क फॉलोज’ यासारख्या अविस्मरणीय जाहिरात मोहिमा साकारल्या. त्यांच्या शैलीने इंग्रजी-केंद्रित जाहिरातींचे स्वरूप बदलले आणि त्या भारताच्या मातीत रुजविल्या. पीयूष पांडे यांना २०१६मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्कार मिळाला. २०१८मध्ये ते आणि त्यांचे भाऊ प्रसून पांडे हे ‘कान्स लायन्स फेस्टिव्हल’मधील प्रतिष्ठित ‘लायन ऑफ सेंट मार्क’ पुरस्कार मिळवणारे पहिले आशियाई ठरले. त्यांनी ‘अब की बार, मोदी सरकार’ हे घोषवाक्य तयार करून राजकीय जाहिरातींनाही नवा आयाम दिला. भारतीय जाहिरात जगतातील अनेक नामवंतांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून, त्यांच्या हृदयाला भिडणाऱ्या जाहिरातींचा वारसा पुढील पिढ्यांना प्रेरणा देणारा ठरेल, असेही म्हटले आहे.
...
एक महान द्रष्टा गमावला ः मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना म्हटले आहे, ‘पीयूष पांडे यांची सर्जनशीलता आणि योगदान अविस्मरणीय आहे. त्यांच्या निधनाने भारतीय जाहिरात विश्वाने एक महान द्रष्टा गमावला आहे.’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

