कल्याणकरांना मिळणार कोंडीतून दिलासा
कल्याणकरांना मिळणार कोंडीतून दिलासा
वालधुनी पुलाच्या बेअरिंग बदलण्याचे काम सुरू
कल्याण, ता. २५ (वार्ताहर) : कल्याण डोंबिवली महापालिकेने वालधुनी पुलाच्या बेअरिंग बदलण्याच्या महत्त्वपूर्ण कामाला सुरुवात केली आहे. कल्याणमधील तिन्ही महत्त्वाचे आणि अतिवापरातील वालधुनी पूल, एफ-कॅबिन फ्लायओव्हर पूल आणि प्रल्हाद शिंदे पुलाच्या दुरुस्ती आणि पुनरुज्जीवनाच्या पहिल्या टप्प्यातील हे काम आहे. या तिन्ही पुलांवर लवकरच मास्टिक डांबराचे काम सुरू होणार आहे.
पुलांच्या खालावत चाललेल्या स्थितीमुळे आणि वारंवार पडणाऱ्या खड्ड्यांमुळे दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. यापैकी सर्वाधिक वाहतूक असलेल्या वालधुनी पुलावर सध्या संरचनात्मक दुरुस्तीचे मोठे काम सुरू आहे. यामध्ये तब्बल २३६ बेअरिंग बदलण्याचे काम सुरू असून, हे महत्त्वाचे देखभाल कार्य अनेक वर्षांपासून प्रलंबित होते.
महापालिका अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पुलांचे बेअरिंग साधारणतः दर १५ वर्षांनी बदलणे आवश्यक असते; मात्र सुमारे ३५ वर्षे जुन्या वालधुनी पुलावरील अत्याधिक वाहतूकभारामुळे हे काम दशकांपासून पुढे ढकलले गेले होते. हा पूल कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांदरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी जीवनरेखा मानला जातो. पुलाच्या खराब पृष्ठभागामुळे नागरिकांना विशेषतः पावसाळ्यात मोठा त्रास होत होता.
सध्या केडीएमसीने वाहतूक बंद न करता बेअरिंग बदलण्याचे काम सुरू केले असून, यामुळे पुलावरील वाहतूक सुरळीत सुरू आहे. बेअरिंगचे काम पूर्ण झाल्यावर या तिन्ही पुलांवर टप्प्याटप्प्याने मास्टिक डांबराचे काम करण्यात येणार आहे.
वाहतूक व्यवस्थापन आराखडा तयार
शहर अभियंता अनिता परदेशी यांनी सांगितले, की आयुक्त अभिनव गोयल यांच्या निर्देशानुसार या पुलांच्या दुरुस्तीला प्राधान्य देण्यात आले आहे, जेणेकरून नागरिकांना सुरक्षित आणि सुरळीत प्रवासाचा अनुभव मिळेल. मास्टिक डांबराच्या थरामुळे पुलांचा टिकाऊपणा वाढेल आणि पुढील पाच वर्षांपर्यंत खड्ड्यांचा त्रास होणार नाही. या कामादरम्यान नागरिकांना कमीत कमी त्रास होईल यासाठी वाहतूक व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

