जोगेश्वरीतील जेएमएस बिझनेस सेंटरचा वीज-पाणी पुरवठा खंडित
जेएमएस इमारतीचा वीज-पाणीपुरवठा खंडित
ओसीशिवाय कार्यालये सुरू; विकसकाला पालिकेची नोटीस
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : जोगेश्वरी (पश्चिम) येथील जेएमएस बिझनेस सेंटर या व्यावसायिक इमारतीला लागलेल्या आगीत मोठे आर्थिक नुकसान झाले. तपासात इमारतीला अद्याप ऑक्युपेशन सर्टिफिकेट (ओसी) मिळाले नसल्याचे उघड झाले. ‘ओसी’शिवाय व्यवसाय व कार्यालये सुरू केल्याबद्दल मुंबई महापालिकेने इमारतीचा वीज व पाणीपुरवठा खंडित केला आहे. तसेच संबंधित विकसकाला नोटीस देऊन पुढील कारवाई केली जाणार असल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले.
जेएमएस बिझनेस सेंटर या व्यावसायिक इमारतीत गुरुवारी सकाळी लागलेल्या भीषण आगीत अंदाजे १५ ते २० कार्यालयांचे नुकसान झाले. अग्निशमन दलाने सुमारे दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आणली. या दुर्घटनेत कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. पालिकेच्या प्राथमिक चौकशीत इमारतीतील अग्निशमन यंत्रणा कार्यरत नसल्याचे तसेच आवश्यक नागरी परवानगी न घेता कार्यालये सुरू करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर बिल्डिंग प्रपोजल विभाग आणि डीपी विभागाकडून स्वतंत्र चौकशी व कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. महापालिकेच्या नियमानुसार ओसी किंवा एनओसी घेणे बंधनकारक आहे; मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत व्यावसायिक वापर केल्यास प्रति चौरस मीटर १०० रुपये दंड आकारला जातो. या तरतुदीनुसार संबंधित विकसकावर दंडात्मक कारवाई होणार आहे. तसेच इमारतीचे संपूर्ण स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश देण्याचीही शक्यता आहे, असे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
----
अग्निसुरक्षेच्या देखभालीकडे दुर्लक्ष
या घटनेनंतर मुंबईतील व्यावसायिक इमारतींतील अग्निसुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. अग्निशमन विभागाच्या आकडेवारीनुसार, शहरातील सुमारे ९० टक्के आगी शॉर्टसर्किटमुळे लागतात, तर दुसऱ्या क्रमांकावर घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरमुळे लागणाऱ्या आगी आहेत. गेल्या दोन वर्षांत फटाक्यांमुळेही तब्बल २०० आगी लागण्याच्या घटना नोंदल्या गेल्या आहेत.
..............
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

