''वोटचोरी'' आरोपाला भाजप आमदाराची सहमती: जिल्हाध्यक्ष पूनम पाटील

''वोटचोरी'' आरोपाला भाजप आमदाराची सहमती: जिल्हाध्यक्ष पूनम पाटील

Published on

''वोटचोरी'' आरोपाला भाजप आमदाराची सहमती: जिल्हाध्यक्ष पूनम पाटील
तुर्भे, ता. २५ (बातमीदार) ः निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करताना, बेलापूर विधानसभेच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी प्रसारमाध्यमांना समोर अधिकारी पैसे घेऊन बोगस मतदारांची नोंदणी करतात. या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, नवी मुंबई काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पूनम पाटील यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
आमदार मंदा म्हात्रे यांच्या विधानानुसार, निवडणूक विभागातील काही अधिकारी आर्थिक लाभ घेऊन अवैध पद्धतीने मतदार याद्यांमध्ये बोगस नावे समाविष्ट करतात. यामुळे मतदान प्रक्रियेची विश्वासार्हता धोक्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले. हे आरोप महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर समोर आले असून, येत्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, काँग्रेस जिल्हाध्यक्ष पूनम पाटील यांनी आमदार म्हात्रे यांच्या वक्तव्याला काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ''वोटचोरी''च्या आरोपांशी जोडले. भाजप आमदारांनी केलेले हे वक्तव्य म्हणजे राहुल गांधी यांच्या आरोपांना एकप्रकारे सहमतीच आहे, असे पाटील म्हणाल्या. राहुल गांधी यांनी यापूर्वी देशभरातील निवडणुकांमध्ये मतदार याद्या आणि ईव्हीएममध्ये हेराफेरी होत असल्याचे आरोप केले होते. पाटील यांच्या मते, भाजपमधील आमदार आता त्याच दिशेने बोलत असल्याने पक्षांतर्गत विरोधाभास उघड झाला आहे. तर भाजप आमदार मंदा म्हात्रे यांच्या विधानाला अनुसरून उच्च न्यायालयातर्फे सुमोटो अंतर्गत चौकशी होणे अपेक्षित असून, चौकशीअंती निवडणूक आयोगातील दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होणे गरजेचे असल्याचे मत पाटील यांनी व्यक्ती केले. तसेच, मतदार याद्यांचे पुन: निरीक्षण आणि पुन:र्परीक्षण होणेही गरजेचे असल्याचे मत पूनम पाटील म्हणाल्या आहेत.
..................
निवडणूक आयोगाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची चौकशी करा
मनसेची नवी मुंबई पोलिस आयुक्तांकडे मागणी
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता, २५ : बेलापूर विधानसभा आमदार मंदा म्हात्रे यांनी १८ व २० ऑक्टोबर २०२५ रोजी विविध प्रतिष्ठित प्रसार माध्यमांशी बोलताना नवी मुंबईत निवडणूक आयोगाचे अधिकारी पैसे घेऊन बोगस मतदार यांची नाव नोंदणी करतात असा गंभीर आरोप केला आहे. मुळातच बेलापूर विधानसभेत साधारण १५ हजार दुबार नावे व १८ हजार बोगस नावे असल्याचे पुराव्यासहित निवेदन मनसे तर्फे गजानन काळे यांनी ४ ऑक्टोबर २०२४ रोजी बेलापूर विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी यांना दिले होते. मात्र त्या नंतर अद्यापपर्यंत यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नसताना आता भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी निवडणूक आयोगाचे अधिकारीच पैसे घेऊन अशी नावे नोंदवतात, असा गंभीर आरोप केल्याने सर्वत्र चर्चा होत आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्य या संविधानिक पदावर असणारी व्यक्ती सबळ पुराव्याशिवाय असे आरोप करणार नाही. तरी याची दखल घेऊन ते कोण भ्रष्ट अधिकारी निवडणूक आयोगात आहेत, यांची नावे व पुरावे मंदा म्हात्रे यांच्याकडून घ्यावी अशी मागणी गजानन काळे यांनी नवी मुंबई पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्याकडे केली आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून गुन्हे दाखल करून त्यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणीसुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे केली. कर्नाटक राज्यात प्रत्येकी ८० रुपये घेऊन बोगस नावे टाकण्यात आल्याचे पुरावे SIT एसआयटी चौकशीत समोर आले आहे. नवी मुंबईतसुद्धा अशा प्रकारे गुन्हा नोंदवल्यास पुढे चौकशीत अशा बऱ्याच बाबी समोर येऊ शकतात, असे गजानन काळे यांनी पोलिस आयुक्त यांना सांगितले. मनसेच्या शिष्टमंडळात प्रवक्ते व शहर अध्यक्ष गजानन काळे, शहर सचिव विलास घोणे, सचिन कदम, शहर सहसचिव अभिजीत देसाई, मनसे महिला सेना शहरअध्यक्ष डॉ. आरती धुमाळ, पालिका कामगार सेना शहर अध्यक्ष आप्पासाहेब कौठुळे, विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष संदेश डोंगरे, मनसे विभाग अध्यक्ष अमोल आयवळे, भूषण कोळी, उपविभागअध्यक्ष राजेंद्र खाडे, विद्यार्थी सेना उपशहर अध्यक्ष प्रतिक खेडेकर, विभाग अध्यक्ष प्रद्युम्न हेगडे हे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com