दिवाळी पर्यटनासाठी नॅशनल पार्कला पसंती
दिवाळी पर्यटनासाठी नॅशनल पार्कला पसंती
चार दिवसांत २२ हजार जणांची भेट, २१ लाखांचे उत्पन्न
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ ः संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी दिवाळीच्या सुट्टीत पर्यटक येथे हजेरी लावत आहेत. चार दिवसांत २२ जणांनी भेट दिली असून २० लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.
दिवाळीच्या सुट्ट्या असल्याने पालक मुलांना राणीची बाग, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आदी ठिकाणी भेट देण्यासाठी घेऊन जातात. विशेषतः संजय गांधी उद्यानात असलेली हिरवळ, विविध प्रकारची झाडे, फुले, फुलपाखरे, प्राणी पाहायला मुलांना आवडते. त्यामुळे दिवाळी नाताळ आणि उन्हाळी सुट्टीत मुलांची येथे गर्दी असते.
निसर्ग संवर्धन हे राष्ट्रीय उद्यानाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. राष्ट्रीय उद्यानाच्या माध्यमातून आपल्या प्रदेशातील निसर्गाचा अभ्यास करण्याची संधी निसर्ग अभ्यासकांना उपलब्ध होते. त्याशिवाय नागरिकांसाठी मनोरंजन उपलब्ध करणे हाही महत्त्वाचा घटक आहे.
हे राष्ट्रीय उद्यान पश्चिम घाटाचा भाग असल्याने येथे पश्चिम घाटातील जैववैविध्य सहजपणे पाहायला मिळते. मुंबईचा सुमारे २० टक्के भूभाग या राष्ट्रीय उद्यानाने व्यापला आहे. या राष्ट्रीय उद्यानात १९व्या शतकात ब्रिटिशांनी बांधलेल्या विहार आणि तुळशी तलावांचा समावेश आहे. या तलावांमधून मुंबईसाठी काही प्रमाणात पाणीपुरवठा होतो. आणखी एक आकर्षण म्हणजे येथे असलेल्या बौद्धकालीन गुंफा. या कान्हेरी गुंफा सुमारे दोन हजार वर्षे जुन्या असल्याचे सांगितले जाते. या उद्यानामधून निसर्ग उद्यानाच्या माध्यमातून जंगल समजून घेण्यासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या ट्रेल्समध्ये प्रत्येक वेळी निसर्ग वेगळा अंदाज दाखवतो. प्रत्येक ऋतूमधील जंगल पाहणे हा अनुभव समृद्ध करणारा असतो. या जंगलामध्ये बिबट्यांचा मुक्त संचार आहे.
मी कुटुंबीयांसोबत राजस्थानवरून मुंबईत आलो असता नॅशनल पार्कला भेट दिली, खूप छान वाटले, अशी प्रतिक्रिया पर्यटक सागर राठोड यांनी दिली.
पर्यटक निम शुक्ला म्हणाली, की मी नेहमीच नॅशनल पार्कला भेट देते. बहुतांश स्थळे मी पाहिलेली आहेत. त्यामध्ये टायगर सफारी, कान्हेरी लेणी पुन्हा पुन्हा पाहायला आवडते.
सिंह आणि व्याघ्रसफारी
वाघ आणि सिंह सामान्य नागरिकांना हे प्राणी पाहता यावेत, यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्येही सिंहसफारी, व्याघ्रसफारीचे आयोजन करण्यात येते. हे प्राणी इतर वेळी पिंजऱ्यांमध्ये असतात. जंगलामध्ये त्यांच्यासाठी विशिष्ट भाग तयार केले आहेत. सफारीच्या वेळी एका बंदिस्त बसमधून पर्यटकांना या भागाची सैर घडवली जाते.
तिकीट विक्री (प्रौढ)
दिनांक - संख्या - उत्पन्न
२१ ऑक्टोबर - ५,७२० - ५,८९,१६०
२२ ऑक्टोबर - ५,९७२ - ६,१५,११६
२३ ऑक्टोबर - ४,८०६ - ४,९५,०१८
२४ ऑक्टोबर - ३,०३८ - ३,१२,९१४
एकूण - १९,५३३ - २०,१२,२०८
=====
तिकीट विक्री (मुले)
दिनांक - संख्या - उत्पन्न
२१ ऑक्टोबर - ५५ - ३,०२५
२२ ऑक्टोबर - ९७७ - ५३,७३५
२३ ऑक्टोबर - ९२१ - ५०,६५५
२४ ऑक्टोबर - ६४३ - ३५,३६५
एकूण - २,५९६ - १,४२,७८०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

