धारावीकरांना सर्वेक्षण संधी

धारावीकरांना सर्वेक्षण संधी

Published on

धारावीकरांना सर्वेक्षण संधी
१ ते १५ नोव्हेंबर डीआरपीची विशेष मोहीम

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : अपुरी कागदपत्रे किंवा अन्य कारणांमुळे सर्वेक्षणाची प्रक्रिया पूर्ण न केलेल्या धारावीकरांना राज्य सरकारने पुन्हा एक संधी उपलब्ध करून दिली आहे. सर्व लाभार्थ्यांना धारावी पुनर्विकास प्रकल्पात सामावून घेण्याच्या उद्देशाने धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या (डीआरपी) वतीने दस्तावेज संकलनासाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात येणार आहे. १ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबरदरम्यान ही मोहीम राबविली जाणार असून, त्यामध्ये सहभागी होणाऱ्या पात्र धारावीकरांना त्यांचे आवश्यक दस्तावेज डीआरपीसमोर सादर करून सर्वेक्षणाची प्रक्रिया पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे.
धारावीतील प्रत्येक पात्र कुटुंब पुनर्विकासापासून वंचित राहू नये म्हणून त्यांना सर्वेक्षणात सहभागी करून घेण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या या विशेष मोहिमेचा लाभ जास्तीत जास्त रहिवाशांनी घ्यावा, असे आवाहन राज्य शासनाच्या वतीने करण्यात आले आहे. दोन आठवड्यांच्या या व्यापक मोहिमेत अपूर्ण अथवा अंशतः पडताळणी झालेल्या प्रकरणांची नोंद पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. तरी सर्व रहिवाशांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन निर्धारित दस्तावेज संकलन केंद्रांवर आवश्यक दस्तावेज जमा करावेत, असे आवाहन डीआरपीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने केले. दरम्यान, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून आपल्या सदनिकांचे सर्वेक्षण पूर्ण केलेल्या धारावीकरांना प्राधान्य देण्यासाठी, परिशिष्ट २ म्हणजेच ड्राफ्ट अनेक्स्चर-२ जारी करायला सुरुवात केली आहे. तसेच ज्यांचे सर्वेक्षण अद्याप सुरू आहे किंवा नुकतेच पूर्ण झाले आहे, त्यांचा समावेश पुढील यादीत करण्यात येईल, असेही डीआरपीने स्पष्ट केले आहे.
...
सेक्टरनिहाय कार्यालये
डीआरपी आणि नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या (एनएमडीपीएल) सहाय्याने राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आणि सर्वेक्षण अधिकारी यांच्या नेतृत्वात धारावीमध्येच सेक्टरनिहाय तात्पुरत्या कार्यालयांची उभारणी करण्यात येणार आहे. दस्तावेजांचे संकलन, पडताळणी आणि तक्रार निवारण अशा पद्धतीचे काम या कार्यालयांतून केले जाईल. घरोघरी जाणारे सर्वेक्षण अधिकारी आणि मध्यवर्ती कॉल सेंटरच्या माध्यमातून या मोहिमेचा कालावधी, आवश्यक दस्तावेज आणि अन्य माहिती रहिवाशांपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था एनएमडीपीएलकडून करण्यात येणार आहे. ही मोहीम १ ते १५ नोव्हेंबरपर्यंत दररोज सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत राबविली जाणार आहे.
...
दस्तावेज संकलन शिबिराची ठिकाणे
१. शालिमार इंडस्ट्रीयल इस्टेट, टाटा पॉवरजवळ, टी. एच. कटारिया मार्ग, माटुंगा लेबर कॅम्प
२. १०१/१०२, ओ विंग, कामराज स. गृ. संस्था, के. के. कृष्णन मेनन मार्ग, बालाजी नगर, धारावी
३. एनएमडीपीएल स्कील सेंटरच्यावर, बाबासाहेब आंबेडकर स्कूलजवळ, एम. पी. नगर, धारावी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com