उभ्या पिकांवर पावसाचा आघात

उभ्या पिकांवर पावसाचा आघात

Published on

उभ्या पिकांवर पावसाचा आघात
कर्जतमधील १,७६१ हेक्टर भातशेतीचे नुकसान
कर्जत, ता. २७ (बातमीदार) : तालुक्यातील भातशेतीला पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. अनेक ठिकाणी पिके आडवी होऊन सडली असून, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांमधून सरसकट पंचनामे करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
कर्जत तालुक्यात सतत पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे भातशेतीचे पीक पूर्णपणे हातातून गेले आहे. अनेक शेतकऱ्यांची वर्षभराची मेहनत पाण्यात गेली आहे. दसऱ्यापासून सुरू झालेल्या पावसाने भातपीक आडवे केले होते, तर कापणीवेळीच परतीच्या पावसाने उरलेसुरलेल्या पिकाचे नुकसान केले.
त्यामुळे एकरी किमान ५०,००० रुपयांची नुकसानभरपाई द्यावी. तसेच भातपिकाला प्रति क्विंटल ४,००० रुपये हमीभाव देण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे. लहरी निसर्गामुळे बसलेला आघात ओळखून महसूल प्रशासन आणि कृषी विभाग तत्परतेने कामाला लागला आहे. याच अनुषंगाने सोमवार (ता. २७) तातडीची बैठक घेण्यात आली आहे. या वेळी ३० ऑक्टोबरपर्यंत तालुक्यातील पंचनामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. शेतकऱ्यांना सरसकट भातशेतीच्या नुकसानीनुसार नुकसानभरपाई दिली जाईल, असेही कृषी अधिकारी राजाराम शिंदे यांनी सांगितले.
---------------------------------
पाहणी केलेली गावे - २०८
नुकसान झालेले क्षेत्र - १७१.८६ हेक्टर
झालेले पंचनामे - ४५१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com